नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नाशिक जिल्ह्यात यायला राहुल गांधींना “वायनाड” सापडला; आदित्य आणि पवार येणार साथीला!! असेच राहुल गांधींच्या भारत जोडून न्याय यात्रेमध्ये महाराष्ट्रात घडणार आहे.Rahul Gandhi finds “Wayanad” to come to Savarkar’s Nashik district; Aditya and Pawar will come together!!
राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 13 आणि 14 मार्चला उत्तर महाराष्ट्रात येणार आहे. त्यामध्ये राहुल गांधींनी सावरकरांच्या नाशिक जिल्ह्यात प्रवेश करताना नाशिक जिल्ह्यातल्या “वायनाड”ची म्हणजे मालेगावची निवड केली आहे. राहुल गांधींनी स्वतःसाठी सुरक्षित मतदारसंघ निवडताना जिथे देशातले अल्पसंख्यांक बहुसंख्यांक आहेत, म्हणजेच मुस्लिम समाज जिथे बहुसंख्यांक आहे, त्या वायनाडची निवड केली. तशीच सावरकरांच्या नाशिक जिल्ह्यात प्रवेश करताना त्यांनी नाशिक जिल्ह्यातले “वायनाड” म्हणजे मुस्लिम बहुल मालेगावची निवड केली आहे.
राहुल गांधींचा नाशिक जिल्ह्यातला पहिला कार्यक्रम 13 मार्च रोजी मालेगाव मध्ये होणार असून मालेगावातल्या कार्यक्रमानंतर ते सैंदाणे येथील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये मुक्काम करणार आहेत. त्यानंतर 14 मार्च रोजी राहुल गांधी चांदवड मध्ये कांदा उत्पादक शेतकरी मेळाव्यात सामील होणार असून त्यामध्ये आदित्य ठाकरे आणि शरद पवार यांचा देखील सहभाग असणार आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेत आदित्य ठाकरे आणि शरद पवार यांचा सावरकरांच्या नाशिक जिल्ह्यातला सहभाग महाविकास आघाडीसाठी बूस्टर डोस ठरण्याची अपेक्षा आहे.
राहुल गांधी नाशिक मध्ये रोड शो करणार असून ते इंदिरा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार आहेत. त्यानंतर काळाराम मंदिरात येऊन ते श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत. या त्यांच्या रोड शो मध्ये आदित्य ठाकरे देखील त्यांच्या समावेत असण्याची अपेक्षा आहे. शरद पवार फक्त चांदवडच्या मेळाव्यात राहुल गांधींसमावेत असणार आहेत. त्यानंतर त्यांचे दोन दिवस वेगवेगळे कार्यक्रम असणार आहेत.
भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यात राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान भगूरला भेट देण्याची शक्यताच नाही, त्यामुळे आदित्य ठाकरे देखील राहुल गांधींच्या दौऱ्या दरम्यान तिथे जाण्याची शक्यता संभवत नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App