विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कृषी बिलांच्या मुद्द्यावर राष्ट्रपतींना भेटून आल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी शेतकऱ्यांचा मोदी सरकारवर विश्वास उरला नसल्याचे सांगितले. तर त्याच पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते शरद पवारांनी मोदी सरकारला आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली. rahul gandhi comes down on modi govt
कृषी बिलांवरून मोदी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. मोदी सरकार तानाशाह आहे, अशी टीका राहुल गांधींनी केली, तर शेतकरी कडाक्याच्या थंडी वाऱ्यात आंदोलन करताहेत. कृषी कायद्यांबाबत त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन प्रश्न सोडविणे हे सरकारचे कर्तव्य आहे, अशी जाणीव शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारला करवून दिली. rahul gandhi comes down on modi govt
राहुल गांधींनी सडकून टीका केली असली तरी दस्तुरखुद्द पवारांकडून अशी जाणीव करवून देण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ऐकतील का? आणि ऐकले तर कोणता निर्णय घेतील, या विषयी उत्सुकता आहे.
राहुल गांधींना समजून घेण्यात शरद पवार कमी पडले; बाळासाहेब थोरातांचा पलटवार
पंजाबचे ज्येष्ठ नेते प्रकाशसिंग बादल यांनी आधी पद्मविभूषण परत करून नंतर मोदींना पत्र लिहिले होते. परंतु, मोदींनी कृषी बिलांच्या मुद्द्यावर त्यांच्या पत्रानुसार माघार घेतलेली नाही. शरद पवार यांनी आज मोदी सरकारला कर्तव्याची जाणीव करवून दिली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची विरोधकांच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पवारांनी शेतकरी आंदोलनाविषयी मत व्यक्त केले आणि यावर मोदी सरकारला लवकर तोडगा काढण्याचे आवाहन केले.
शिष्टमंडळात काँग्रेस नेते राहुल गांधी, डाव्या पक्षांचे नेते सीताराम येचुरी, डी. राजा, द्रमूकचे नेते टी. आर. बालू हे होते. या सर्व नेत्यांनी मोदी सरकारवर टीका केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App