विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्यावर प्रसिद्ध मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर इंडियाकडून कारवाई करण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी ४ ऑगस्ट रोजी केलेल्या ट्विटवर आक्षेप घेत ट्विटरने ही कारवाई केली असून, त्यांचं अकाऊंट ब्लॉक करण्यात आलं आहे. ट्विटरकडून दिल्ली उच्च न्यायालयात ही माहिती देण्यात आली.Rahul Gandhi: Action against Rahul Gandhi from Twitter; Account locked due to ‘that’ tweet
सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांच्या भेटीसंदर्भात राहुल गांधी हे ट्विट केलं होतं. दिल्लीतील छावणी परिसरालगत असलेल्या एका गावात एका नऊ वर्षाच्या मुलीची सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली. ऐन पावसाळी अधिवेशनादरम्यान ही घटना घडल्यानं राजकीय पक्षांकडून पीडितेच्या कुटुंबियांच्याही भेटी घेण्यात आल्या होत्या.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पीडितेच्या कुटुंबियांच्या फोटोसह एक ट्विट केलं होतं. त्याचबरोबर न्याय मिळेपर्यंत आपण पीडितेच्या कुटुंबियांसोबत असल्याचंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.
दरम्यान राहुल गांधी यांच्या ट्विटवर आक्षेप घेण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते मकरंद सुरेश म्हाडलेकर यांनी यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. बलात्कार पीडितेची ओळख उघड न करण्यासंदर्भात करण्यात आलेल्या कायद्यांचं उल्लंघन केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली होती.
उच्च न्यायालयसमोर झालेल्या सुनावणी वेळी उच्च न्यायालयाच्या खंठपीठाने ट्विटरचे वकील सज्जन पुवय्या यांना राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटबद्दल विचारणा केली होती. राहुल गांधींनी केलेलं ट्विट हटवण्यात आलं आहे का? असं न्यायालयाने विचारलं; त्यावर ते ट्विट ट्विटरच्या धोरणाविरोधात असून, हटवण्यात आलेलं आहे, असं पुवय्या यांनी सांगितलं. त्यावर न्यायालयानं ट्विटरचं कौतुक केलं. त्यावर याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला. फोटो आणि ट्विट कधी हटवण्यात आलं, याबद्दल ट्विटरने प्रतिज्ञापत्र सादर करावं, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली. या प्रकरणी पुढील सुनावणी २७ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App