राहुल गांधी तर फक्त “निवडक” चुकांची जबाबदारी घेतली; पण काँग्रेसच्या चुकांची किंमत सगळ्या देशाला मोजावी लागली!!

Rahul gandhi

लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेसने केलेल्या चुकांची जबाबदारी आपण घेतो असे इंग्लंडमध्ये सांगून आपल्या राजकीय मोठेपणाचा आव आणून दाखविला. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला राहुल गांधी कसे जबाबदार नेते आहेत आणि ते चुका मान्य करून त्याची जबाबदारी देखील कशी घेतात याची वर्णने करणारे ट्विट आणि व्हिडिओ राहुल गांधींच्या समर्थकांनी सोशल मीडियावर शेअर केले. पण राजकीय वस्तुस्थिती पाहिली, तर राहुल गांधींनी चुकांची घेतलेली जबाबदारी आणि प्रत्यक्षात काँग्रेसने केलेल्या चुका आणि त्यामुळे सगळ्या देशाला चुकवावी लागलेली किंमत यातली फार मोठी विसंगती समोर येते.Rahul Gandhi accepted Congress mistake selectivally

राहुल गांधींनी फक्त काही निवडक चुकांची जबाबदारी स्वीकारली. 1980 च्या दशकात इंदिरा गांधींनी ऑपरेशन ब्लू स्टार करून सुवर्ण मंदिरावर लष्करी कारवाई केली. ती काँग्रेसची चूक होती. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर देशात शीखविरोधी दंगली उसळल्या. त्यामध्ये हजारो शिखांचे शिरकाण झाले. या दंगली उसळवण्यात बड्या काँग्रेस नेत्यांचा हात होता. ही चूक देखील राहुल गांधींनी स्वीकारली. पण ही चूक स्वीकारताना राहुल गांधी फारच “सिलेक्टिव्ह” राहिले. त्यांनी फक्त शाब्दिक दृष्ट्या चूक स्वीकारली, पण प्रत्यक्षात गुन्हेगार काँग्रेस नेत्यांवर त्यांनी कुठली कारवाई केल्याचे निदर्शनास आले नाही. सज्जनकुमार, जगदीश टायटलर, कमलनाथ या नेत्यांवर कायदेशीर खटले दाखल झाले तरी राहुल गांधी किंवा काँग्रेसने कुठली कठोर कारवाई केल्याचे दिसले नाही. उलट काँग्रेसची सरकारे असताना हे सगळे मंत्री आणि खासदार राहिले.



ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांना शीख विरोधी दंगली बाबतच प्रश्न विचारला होता, त्यावेळी त्यांनी हुआ तो हुआ असे उत्तर दिले होते. त्यावेळी काँग्रेसने त्यांच्या विरोधात थातूरमातूर कारवाई केली. पण राहुल गांधींच्या नुकत्याच झालेल्या अमेरिका दौऱ्यात त्यांनी सॅम पित्रोदा यांच्याकडूनच स्वागत स्वीकारले होते.

– काँग्रेसच्या चुकांची जंत्री

– पण हे सगळे झाले केवळ ऑपरेशन ब्लू स्टार आणि शीख विरोधी दंगली बाबत. त्या पलीकडे काँग्रेसने आणि नेहरू गांधी घराण्याने आपल्या राजकीय इतिहासात एवढ्या चुका केले की त्याची किंमत सगळ्या देशाला चुकवावी लागली. त्याबद्दल राहुल गांधी कुठे काही बोलले नाहीत. नेहरू गांधींच्या नियंत्रणाखाली असलेल्या काँग्रेसच्या चुका मोजल्या तरी त्याची जंत्री फार मोठी ठरेल. अगदी 1941 मध्ये काँग्रेसने जनगणनेवर बहिष्कार घातला त्याचा परिणाम म्हणून भारताच्या सीमावर्ती भागात हिंदू बहुसंख्य असून देखील केवळ त्यांची नोंदणी जनगणनेत झाली नाही म्हणून काही जिल्हे मुस्लिम बहुल ठरले आणि फाळणीच्या वेळी ते पाकिस्तानात गेले. सियालकोट, सिल्हेट, खुलना आदी जिल्ह्यांमध्ये हिंदूंची लोकसंख्या मुस्लिमांपेक्षा अधिक होती पण केवळ काँग्रेसने बहिष्कार घातल्यानंतर हिंदूंनी जनगणनेत नोंदणीच केली नाही म्हणून मुस्लिम बहुसंख्यांक ठरवून ब्रिटिशांनी केलेल्या पाकिस्तानात घातले.

– हिंदू मुसलमान दंगली टाळण्यासाठी आणि कायमचा वाद मिटवण्यासाठी फाळणी स्वीकारल्याचे काँग्रेसने सांगितले. प्रत्यक्षात फाळणी झाल्यानंतर जेवढ्या दंगली झाल्या, त्याच्या निम्म्याने सुद्धा अखंड भारतात झाल्या नव्हत्या. त्यापलीकडे जाऊन फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये हिंदूंचे जेवढे शिरकाण झाले, जेवढी मनुष्यहानी झाली तेवढी जगाच्या इतिहासात कुठल्याही महायुद्धात झाली नाही. फाळणीपूर्वी पाकिस्तानच्या भूभागात 27 % हिंदू होते. त्यात फक्त 1.7 % उरलेत.

– 1950 मध्ये नेहरूंनी लियाकत – नेहरू करार केला. पण प्रत्यक्षात नेहरू सरकारने तो अंमलात मात्र आणला नाही. त्यामुळे पाकिस्तानातल्या धार्मिक अल्पसंख्यांकांना म्हणजेच हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, जैन यांना जे नागरिकत्वाच्या हक्काचे संरक्षण मिळायला हवे होते ते नेहरु सरकारने दिले नाही त्यानंतरच्या कुठल्याच काँग्रेस सरकारांनी दिले नाही.

– 1960 मध्ये नेहरूंनी सिंधू जलकरार केला. जम्मू काश्मीर आणि राजस्थान या राज्यांवर अन्याय करून त्यांच्या हक्काचे पाणी त्यांनी पाकिस्तानला वापरू दिले. सिंधूच्या 80 % पण पाण्यावर पाकिस्तानचा हक्क आणि फक्त 20 % पाण्यावर भारताचा हक्क मान्य करून अति उदारमतवाद दाखविला. पण त्याच सिंधूचे पाणी पिऊन पाकिस्तान माजला आणि भारताविरुद्ध सतत दहशतवाद माजविला.

– 1949 मध्ये भारताला संधी उपलब्ध असताना नेहरूंनी भारताला अणुशक्ती बनविले नाही. भारत शांतताप्रिय देश असल्याने अणुबॉम्ब बनवणार नाही, असे परस्पर ठरवून टाकले. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीचे कायमचे सदस्यत्व चालू झाले असताना भारताचा हक्क डावलून ते परस्पर चीनला बहाल करून टाकले. त्याचे दुष्परिणाम एवढे झाले की, भारत चीनच्या तुलनेत नेहमीच दुय्यम राहिला. 1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण करून भारताचा भूभाग बळकावला. भारताला जागतिक पातळीवर अपमानास्पद पराभव पत्करावा लागला.

– 1971 मध्ये भारताने युद्धात पाकिस्तानचा पराभव केला. बांगलादेशाची निर्मिती केली. भारतीय फौजा लाहोरपर्यंत पोहोचल्या होत्या. पाकिस्तानचे 93 सैनिक युद्धकैदी म्हणून भारताच्या ताब्यात आले. पण त्याचा स्ट्रॅटेजिक वापर करून इंदिरा गांधींनी पाकिस्तानव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात घेतला नाही. पाकिस्तानवर भारताचा कायमचा वरचष्मा मिळवायची संधी गमावली.

– या खेरीज 26/ 11 नंतर एअर स्ट्राईक किंवा सर्जिकल स्ट्राईक करायचा पर्याय भारतीय सैन्य दलाने त्यावेळच्या सोनिया – मनमोहन सिंग सरकारपुढे ठेवला होता. तो पर्याय सरकारने नाकारला.

या आणि अशा अनेक गंभीर चुका काँग्रेसने आपल्या राजवटीत केल्या. या सगळ्या चुकांची संपूर्ण देशाला किंमत चुकवावी लागली, पण त्याविषयी राहुल गांधी यांनी चकार शब्द काढला नाही किंवा स्वतःहून त्या चुकांची जबाबदारी स्वीकारली नाही.

Rahul Gandhi accepted Congress mistake selectivally

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात