जयंत पाटलांच्या मतदारसंघात भावी मुख्यमंत्र्यांची पोस्टर्स!!; दोघात तिसरा की राष्ट्रवादीचा डार्क हॉर्स??

विशेष प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रातल्या निवडणुकीत स्थापनेपासून महाराष्ट्रात स्वबळावर बहुमत मिळवणे तर दूरच, पण एकदाही 100 हा आकडा गाठला नसताना त्या पक्षात मुख्यमंत्री पदाची स्पर्धा इतर कोणत्याही पक्षांपेक्षा तगडी आहे. अजितदादा पवार गेल्या कित्येक वर्षांपासून भावी मुख्यमंत्री आहेत, तर सुप्रिया सुळे या शरद पवारांच्या मनातल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री असल्याची महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात नेहमी चर्चा झडत असते. त्यांच्या खेरीज आज जेव्हा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा वाढदिवस आहे, त्याच दिवशी त्यांच्या शुभेच्छांची पोस्टर्स वाळव्यात लागली आहेत, या पोस्टर्स मध्ये जयंतरावांच्या समर्थकांनी त्यांचा “द बॉस भावी मुख्यमंत्री” असा उल्लेख केल्यामुळे महाराष्ट्रभर जयंत पाटलांच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षाच्या बातम्या झळकल्या आहेत. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत “दोघात तिसरा, सगळे विसरा” असे होणार का?? की जयंत पाटलांच्या रूपाने राष्ट्रवादीतल्या डार्क हॉर्स पुढे सरकला आहे??, अशी चर्चा महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.Race for chief ministership intensifies in NCP as jayant patil supporters throw his hat in the race



10 बजेट मांडणारे अर्थमंत्री पण नंतर घसरण

जयंत पाटलांना राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमी मंत्रीपदी ठेवले. ते महाराष्ट्राचे अर्थमंत्री झाले. 10 वर्षे त्यांनी बजेट सादर केले. त्यानंतर ते वर्षभर गृहमंत्री राहिले. पण त्यांना कायमच उपमुख्यमंत्री पदाने हुलकावणी दिली. नंतर तर त्यांच्याकडे नेहमी ग्रामविकास सारखे राष्ट्रवादीतच तुलनेने दुय्यम मानले गेलेले मंत्रीपद मिळत गेले. जयंत पाटील निष्ठेत कुठेही कमी पडले नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे दोनदा राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा आली, हे खरे पण 15 पेक्षा जास्त वर्षे मंत्री, दोनदा प्रदेशाध्यक्ष त्यामुळे त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा वाढल्यास नवल नाही!!

 विरोधी पक्षनेते पदाची हुलकावणी

तसेही शिंदे – फडणवीस सरकार महाराष्ट्रात सत्तारूढ झाल्यानंतर जयंत पाटलांना विरोधी पक्ष नेते व्हायचे होते. पण राष्ट्रवादीत अजितदादांनी आक्रमकपणे चाल खेळून विधानसभेतले विरोधी पक्ष नेतेपद मिळवले. जयंत पाटलांना विधानसभेत त्यांच्या शेजारी बसावे लागले. या घटनेचा उल्लेख तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर विधानसभेत केला होता.

 राजकीय लॉटरी

अशा सध्याच्या राजकीय स्थितीत जयंत पाटलांचे समर्थक जेव्हा वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या पोस्टर्स वर “द बॉस भावी मुख्यमंत्री”, असे लिहितात तेव्हा जयंत पाटलांची सुप्त इच्छाच ते प्रकट करत असल्याचे दिसते. पण मग जयंत पाटील हे अजितदादा आणि सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत तिसरे आहेत का?? की 2004 मध्ये जशी छगन भुजबळ अथवा त्यानंतर आर. आर. आबा पाटलांना उपमुख्यमंत्री पदाची आणि गृहमंत्री पदाची लॉटरी लागली, तशी मुख्यमंत्री पदाची लॉटरी भविष्यात जयंत पाटलांना लागू शकते, असा आशावाद या पोस्टर्स झळकवण्यामागे आहे??, हा प्रश्न आहे!!

 पवारांचे धक्कातंत्र

शरद पवार हे राष्ट्रवादीत देखील धक्कातंत्राचा वापर करणारे नेते म्हणून ओळखले जातात. राष्ट्रवादीत श्रीमंत मराठा समाजाचा बोलबाला आहे. सगळी महत्त्वाची पदे त्यांच्याकडे आहेत, अशी नेहमीच चर्चा होते. पण या चर्चेला पवार नेहमी मधुकर पिचड, छगन भुजबळ, धनंजय मुंडे अशी उदाहरणे देऊन छेद देत असतात. पण मग जेव्हा राष्ट्रवादीतल्या मुख्यमंत्री पदाची स्पर्धा अजितदादा आणि सुप्रिया सुळे यांच्या भोवती केंद्रित झाली असताना जयंत पाटलांच्या रूपाने तिसरा स्पर्धक मैदानात येतो आहे का?? की त्यांच्या रूपाने पवारांच्या धक्का तंत्रानुसार एक डार्क हॉर्स मैदानात उतरत आहे??, या प्रश्नाचे उत्तर शरद पवारांच्या मनात, अजितदादांच्या राजकीय कृतीत आणि भविष्यकाळाच्या उदरात दडले आहे!!

Race for chief ministership intensifies in NCP as jayant patil supporters throw his hat in the race

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub