PUNJAB POLITICS: पंजाबमध्ये भाजप सुसाट ! काँग्रेसला आणखी एक झटका-सिद्धूंच समर्थन तरीही दोन आमदारांचा पक्षाला रामराम….

विशेष प्रतिनिधी

 

चंदीगड : पंजाब विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसमधून आऊट गोईंग सुरु झाले आहे.यामुळे काँग्रेसच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत.राज्यात येत्या वर्षात निवडणुका होणार असल्याने भाजप निवडणुकीसाठी मैदानात पुर्ण तयारीनिशी उतरले आहे. मुख्यमंत्री पदावरुन हटवल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवीन पक्षाची स्थापना केलीये. त्यांनी भाजपसोबत युती केली. त्यातच आता काँग्रेसच्या 2 आमदारांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.PUNJAB POLITICS,: BJP is strong in Punjab! Another blow to the Congress – Siddhu’s support, but two MLAs say goodbye to the party …

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे पंजाब प्रभारी गजेंद्र सिंह शेखावत यांच्या उपस्थितीत मंगळवारी काँग्रेसच्या 2 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. फतेह सिंह बाजवा आणि बलविंदर सिंह लाड्डी यांनी काँग्रेसला रामराम ठोकला.


पंजाबमध्ये भाजपच्या “राजकीय विकेट”वर माजी क्रिकेटर दिनेश मोंगिया खेळणार!!; २ काँग्रेस आमदारांचाही भाजपात प्रवेश


याशिवाय पंजाबमध्ये ईसाई समुदायाचे मोठे नेते कमल बक्शी, पंजाब-हरियाणा हायकोर्टातून सेवानिवृत्त वकील मधुमीत, उद्योगपती जगदीप सिंह धालीवाल आणि माजी क्रिकेटर दिनेश मोंगिया यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला.

फतेह सिंह यांचे मोठे भाऊ प्रताप सिंह बाजवा यांच्या कादियां विधानसभा मतदारसंघातून त्यांना निवडणूक लढवायची होती. यासाठी सिद्धू यांनी त्यांचं समर्थन देखील केलं होतं. पण आता या जागेवर 2 भावांमध्ये सामना होण्याची शक्यता आहे.

हरगोबिंदपूर येथून काँग्रेसचे आमदार बलविंदर सिंह लड्डी यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. पंजाब काँग्रेस अध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू यांनी दोघांनाही पाठिंबा दिला होता. पण दोन्ही आमदारांनी भाजपमध्ये जाणं पसंत केलं आहे.

अमरिंदर सिंह यांच्यामुळे भाजप अजून मजबूत झालीये. दुसरीकडे आम आदमी पक्ष देखील पंजाबमध्ये जोर लावत आहे. त्यामुळे काँग्रेस पुढचं आव्हान आणखी वाढणार हे नक्की .

 

PUNJAB POLITICS,: BJP is strong in Punjab! Another blow to the Congress – Siddhu’s support, but two MLAs say goodbye to the party …

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात