विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली:पंजाब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला . मला अपमानित झाल्यासारखे वाटत असल्याची खंत व्यक्त करत कॅप्टनने काँग्रेस सोडण्याचे संकेतही दिले आहेत. कॅप्टनच्या पुढील वाटचालीबाबत भारतीय जनता पक्षात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या अनेक नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, भाजपने त्यांचे देशभक्त म्हणून कौतुक देखील केले आहे. PUNJAB CM RESIGN: Captain Amarinder Singh is a patriot! Will join BJP …? He also opposed Rahul Gandhi for the country
कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपचे प्रवक्ते जफर इस्लाम एका टीव्ही चॅनेलवर म्हणाले, “अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला फायदा होईल की तोटा हा नंतरचा मुद्दा आहे. पण ज्या प्रकारे कॅप्टन अमरिंदर सिंग यांना हटवून अपमानित करण्यात आले, जनता हे सर्व पाहत आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग हे देशभक्त आहेत. इतिहासात डोकाऊन पाहिले त जेव्हा देशासाठी उभे राहण्याची गरज भासली तेव्हा राहुल गांधींच्या विरोधात जाऊनही ते देशाच्या पाठीशी उभे राहिले.
गुजरातचे मुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ शांततेने बदलले आहे तरी काँग्रेसमध्ये यावरून गदारोळ सुरू आहे आहे, असा टोला लगावत जफर इस्लाम म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी देशाच्या विरोधात वक्तव्य करतात, तर अमरिंदर देशाच्या हितासाठी बोलतात. जफर म्हणाले, “कॅप्टन हे काँग्रेसच्या काही मोजक्या नेत्यांपैकी एक आहेत जे देशाच्या हितासाठी उभे आहेत. पाकिस्तानने यूएनमध्ये राहुल गांधींच्या वक्तव्याचा वापर केला, परंतु अमरिंदर यांचे वक्तव्य पाकिस्तानच्या विरोधात होते.
ते सैन्यात अधिकारी होते, त्यांना माहित आहे की देशाच्या हिताच्या वर काहीही नाही. सिद्धू पाकिस्तानात जाऊन बाजवाला मिठी मारतात, त्यांना इथे प्राधान्य दिले जाते, पण कॅपटनचा मात्र अपमान होतो.
भाजप स्वागत करायला तयार आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना जफर इस्लाम म्हणाले की, पक्षात कोण घ्यायचे आणि कोण नाही हे पक्षाचे नेतृत्व ठरवते, पण जे देशभक्त आहेत आणि देशहिताचे काम करत आहेत त्यांचे आम्ही स्वागत करतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App