वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी 5 वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून ट्विटद्वारे देण्यात आली. Prime Minister Narendra Modi to address the nation at 5 PM today, 7th June.
देशातील लसीकरण, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे झालेले नुकसान, औषधे आदींवर ते बोलण्याची शक्यता आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. आज लाखावर नवे रुग्ण सापडले आहेत. अनेक राज्यांनी अनल़ॉकची प्रक्रिया सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी 5 वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत.
पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबतचे ट्विट केले आहे. देशातील लसीकरण, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे झालेले नुकसान, औषधे आदींवर ते बोलण्याची शक्यता आहे. याचसोबत ते लोकांना कोरोनामध्ये घ्यायची काळजी, मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि तिसऱ्या लाटेच्या शक्यतेवरून काळजी घेण्याचे आवाहन करण्याची शक्यता आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App