देशात चीनी व्हायरसचा कहर असताना देशवासियांमध्ये उमेदीची भावना निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशा आणि चांगल्या आरोग्यासाठी दिवा लावा असे आवाहन केले होते. पंतप्रधानांचे हे ट्विट वर्षातील सर्वाधिक रिट्विट म्हणजे व्हायरल झाले होते.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात चीनी व्हायरसचा कहर असताना देशवासियांमध्ये उमेदीची भावना निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशा आणि चांगल्या आरोग्यासाठी दिवा लावा असे आवाहन केले होते. पंतप्रधानांचे हे ट्विट वर्षातील सर्वाधिक रिट्विट म्हणजे व्हायरल झाले होते. Prime Minister Narendra Modi latest news
ट्विटर इंडियाने यंदाच्या वर्षीचा रिपोर्ट जाहीर केला आहे. यामध्ये वर्ष २०२० मध्ये पंतप्रधान मोदींचे ट्विट सर्वाधिक व्हायरल झाल्याचे म्हटले आहे. ३ एप्रिल रोजी देशात चीनी व्हायरसचा कहर सुरू झाला होता. लोकांमध्ये प्रचंड धास्ती निर्माण झाली होती. या दिवशी पंतप्रधानांनी रात्री नऊ वाजता देशवासियांशी संवाद साधला होता.
आपण काहीच बदलू शकत नाही ही भावना मनातून काढून टाका, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे युवकांना आवाहन
आपल्या घराची सुरक्षा आणि एकीची भावना वाढविण्यासाठी त्यांनी देशवासियांना प्रतिकात्मक स्वरुपात दिवा लावण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधान म्हणाले होते की, या दिव्याच्या प्रकाशात प्रत्येकाने मनात संकल्प करावा की आपण एकटे नाही. १३० कोटी भारतीय जनता एकीच्या सुत्रात बांधली आहे. आपला उत्साह हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. चीनी व्हायरस विरुध्दचे युध्द आपल्याला याच उमेदीने जिंकायचे आहे. या वेळी पंतप्रधानांनी कोरोना वॉरियर्सला अभिवादन करण्यासाठी लाईट बंद करून दिवा, टॉर्च किंवा मोबाईल फोनची फ्लॅश लाइॅट लावण्याचे आवाहन केले होते.
पंतप्रधानांनी आपला एक फोटोही ट्विट केला होता. या फोटोनेच हा विक्रम केला आहे. त्यामध्ये पंतप्रधान आपल्या निवासस्थानी दिवा लावताना दिसत आहे. त्यासोबत त्यांनी लिहिले आहे की शुभंकरोती कल्याणम, आरोग्यं धनसंपदा, शत्रुबुध्दीविनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते. पंतप्रधानांच्या या ट्विटला १ लाख १८ हजार लोकांनी रिट्विट केले. त्याचबरोबर ५ लाख १३ हजार लाईक्स मिळत होते.
Prime Minister Narendra Modi latest news
विशेष म्हणजे क्रीडा क्षेत्रासंदर्भातील सर्वाधिक चर्चीले गेलेले ट्विटही पंतप्रधान मोदी यांच्या संदर्भातीलच आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एम. एस. धोनी यांच्या कामगिरीचा गौरव करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले होते. धोनीने धन्यवाद म्हणून ते ट्विट केले. तेही व्हायरल झालेल्या ट्विटमध्ये प्रथम क्रमांकावरचे आहे.
Array