मतभेदांच्या नावाखाली गेल्या शतकात खूप कालापव्यय झाला. आता देश प्रगतिपथावर असून धमार्मुळे कोणीही विकासापासून वंचित राहणार नाही. प्रगतीसाठी आणि स्वप्नपूर्तीसाठी सर्वांना समान संधी मिळेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिली. सब का साथ, सब का विश्वास, सब का विकास या आपल्या धोरणाचा पुनरुच्चार मोदी यांनी केला.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मतभेदांच्या नावाखाली गेल्या शतकात खूप कालापव्यय झाला, देश प्रगतिपथावर असून धमार्मुळे कोणीही विकासापासून वंचित राहणार नाही, प्रगतीसाठी आणि स्वप्नपूर्तीसाठी सर्वांना समान संधी मिळेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे दिली.
Prime Minister Modi statmnent in the program of Aligarh Muslim University
अलीगड मुस्लीम विद्यापीठाच्या (एएमयू) शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. विद्यापीठाचा मिनी-इंडिया असा उल्लेख करत विद्यापीठाच्या विविधतेची प्रशंसा मोदी यांनी केली.
मोदी म्हणाले की, एएमयूचा शैक्षणिक इतिहास हा देशाचा अमूल्य वारसा आहे. या संस्थेचे माजी विद्यार्थी जगभरात भारताच्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करीत आहेत, समाजामध्ये वैचारिक मतभेद आहेत आणि ही बाब स्वाभाविक आहे, परंतु जेव्हा राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करावयाचे असते तेव्हा हे मतभेद दूर ठेवले पाहिजेत.
तरुण पिढीने या विचाराने पुढे जाण्याचे ठरविले तर आपण एकत्रितपणे साध्य करू शकणार नाही असे एकही उद्दिष्ट उरणार नाही असा विश्वास व्यक्त करून पंतप्रधान म्हणाले, शिक्षण, आर्थिक प्रगती, संधी, महिलांचे हक्क, सुरक्षा, राष्ट्रवाद या प्रत्येक नागरिकाच्या गरजा आहेत. डिसेंबर २०१९ मध्ये एएमयू हे सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधाचे एक केंद्र होते. राजकारण हा समाजाचा अंतर्गत भाग आहे हे समजून घेतले पाहिजे, मात्र समाजात राजकारणापेक्षाही अन्य प्रश्न आहेत.
मोदी म्हणाले की, अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या भिंतीवर देशाचा इतिहास कोरला गेला आहे. येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी जगात भारताचं नाव प्रकाशमान करत आहेत. विद्यापीठात शिकलेल्या विद्यार्थ्यांच्या अनेक वेळा परदेशात भेटी झाल्या. तेव्हा बोलताना ते नेहमी हास्य विनोद आणि शेरो शायरीमध्ये रममाण होतात. ते अभिमानानं सांगतात की, आम्ही अलिगढ मुस्लिम विद्यापीठात शिकलो आहोत. हे विद्यापीठ भारताचा अमूल्य ठेवा आहे. या इमारतीशी शैक्षणिक इतिहास जोडला गेलेला आहे.
मोदी म्हणाले की,काही दिवसांपूर्वी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी आपल्याला पत्र लिहिलं होतं. कोरोना लसींच्या संशोधनासाठी सवोर्तोपरी मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली होती. अलिगढ मुस्लिम विद्यापीठ म्हणजे एक मिनी इंडिया आहे. इथे उर्दू, हिंदी, अरबी, संस्कृत शिकवली जाते. ग्रंथालयात कुराण आहे. त्याचबरोबर अनुवादीत केलेलं गीता रामायणही आहे. अलिगढ मुस्लिम विद्यापीठात एक भारत, श्रेष्ठ भारताची चांगली प्रतिमा आहे. इथे इस्लामविषयी जे संशोधन केलं जातं, त्यामुळे भारताचे इस्लामिक देशांशी संबंध अधिक दृढ झाले आहेत, असं मोदी म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App