विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात शंभर कोटी रुपयांचा अब्रू नुकसानाची दावा ठोकण्याचा इशारा देऊन चोवीस तास उलटत नाहीत तोवर सोमय्या यांनी त्यांच्यावर आणखी एक आरोप केला आहे. याला सरनाईक आता काय प्रत्युत्तर देणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.pratap-sarnaik-kirit-somayya-100-crore
प्रताप सरनाईक यांनी एकशे बारा जमिनी (मिळकत) टिटवाळा येथील गुरवली येथे विकत घेतल्या होत्या. मनिलॉन्डरिंग आणि घोटाळ्यातून मिळवलेला पैसा पार्क (मार्गी लावण्यासाठी वापरण्यात आला) ही जमीन खरेदी करण्यात आली, असा मोठा आरोप सोमय्या यांनी गुरुवारी (दि. 17) केला.
सन 2013-14 मध्ये नॅशनल स्पॉट एक्सेंज लिमिटेड (NSEL)मध्ये 5 हजार 600 कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. त्यात प्रताप सरनाईकचे भागीदार मोहित अग्रवाल आणि त्यांचा पूर्ण ग्रुपच्या कंपनीने नॅशनल स्पॉट एक्स्चेंजचे 250 कोटी रुपये त्यांच्या जुगरनट कंपनीत वळविले होते, असे सोमय्या यांचे म्हणणे आहे.
प्रताप सरनाईक यांच्या विहंग ग्रुप आणि मोहित अग्रवाल यांच्या आस्था ग्रुपने भागीदारीत विहंग आस्था हाऊसिंग कंपनीची स्थापना केली. नॅशनल स्पॉट एक्स्चेंज घोटाळ्याचे सुमारे शंभर कोटी रुपये त्यात वळविले आणि या घोटाळ्याच्या पैशातून टिटवाळा येथे 112 जमिनी/मिळकती विकत घेतल्या, असा सोमय्या यांचा आरोप आहे.
ईडीने या घोटाळयाचा तपास करताना प्रताप सरनाईक व मोहित अग्रवाल यांनी संयुक्तरित्या घोटाळ्याचा पैसा आपल्या कंपनीत वळविले असल्याचे आरोपपत्र केले. प्रताप सरनाईक आणि मोहित अग्रवाल यांच्या विभिन्न कंपन्यांवर 2014 मध्येही छापे टाकण्यात आले होते, असा सोमय्या यांचा दावा आहे. ईडीने प्रताप सरनाईकच्या विहंग आस्था हाऊसिंग कंपनीच्या 112 जमिनींवर जप्ती आणली, अँटेचमेंट केली ज्याचा आदेश क्र. 02/2014 आहे, असे सोमय्या म्हणाले.
ईडीच्या दृष्टीने या जमिनी अजून जप्तच आहे. परंतु, तलाठी व तहसीलदार कार्यालयात चौकशी करताना आता या जमिनी इतर कोणाच्या नावावर दिसत आहेत. प्रताप सरनाईक यांनी ईडी आणि मुंबई पोलिसांना न कळवता आपल्या या कंपनीचे नाव विहंग आस्था हाऊसिंग बदलून विहंग सिटी डेव्हलपर्स असे केले. या आणखी एका घोटाळ्याचा तपास करून कारवाई करण्याची मागणी किरीट सोमैया यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी कल्याणचे तहसिलदार व रजिस्ट्रारकडे यांच्याकडे जाऊन तक्रार दाखल केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App