संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडी सरकारमधील संकटमोचक असलेले प्रणव मुखर्जी मंत्रीमंडळात असेपर्यंत सरकार बरे चालले होते, असे अनेक जण मानतात. दिवंगत प्रणव मुखर्जी यांनीच कॉंग्रेसच्या पराभवाची कारणे सांगताना आपण राष्ट्रपती बनल्यानंतर पक्षाच्या नेतृत्वाने राजकीय भान हरवले असे मी मानतो. सोनिया गांधी या पक्षातील प्रकरणे सांभाळण्यात असमर्थ होत्या. डॉ.मनमोहन सिंह यांच्या दीर्घकालीन अनुपस्थितीमुळे इतर खासदारांचा व्यक्तिगत संपर्क संपुष्टात आला होता, असे म्हटले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडी सरकारमधील संकटमोचक असलेले प्रणव मुखर्जी मंत्रीमंडळात असेपर्यंत सरकार बरे चालले होते, असे अनेक जण मानतात. दिवंगत प्रणव मुखर्जी यांनीच कॉंग्रेसच्या पराभवाची कारणे सांगताना आपण राष्ट्रपती बनल्यानंतर पक्षाच्या नेतृत्वाने राजकीय भान हरवले असे मी मानतो. सोनिया गांधी या पक्षातील प्रकरणे सांभाळण्यात असमर्थ होत्या. डॉ. मनमोहन सिंह यांच्या दीर्घकालीन अनुपस्थितीमुळे इतर खासदारांचा व्यक्तिगत संपर्क संपुष्टात आला होता, असे म्हटले आहे.
Pranab Mukherjee has written down the reasons for the defeat of the Congress
प्रणव मुखर्जी यांच्या ‘द प्रेसिडेन्शियल इयर्स’ या आत्मचरित्राचे प्रकाशन जानेवारी महिन्यात होत आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, काँग्रेसच्या काही सदस्यांनी असा अनुमान लावला होता की, जर मी सन २००४ मध्ये पंतप्रधान झालो असतो, तर सन २०१४ मध्ये काँग्रेसचा पराभव कदाचित झाला नसता. मात्र मी हा विचार स्वीकारत नाही, मात्र मी राष्ट्रपती बनल्यानंतर पक्षाच्या नेतृत्वाने राजकीय भान हरवले असे मी मानतो. सोनिया गांधी या पक्षातील प्रकरणे सांभाळण्यात असमर्थ होत्या.
काँग्रेस पक्षाच्या सन २०१४ च्या निवडणुकीतील पराभवाला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आणि काँग्रस अध्यक्षा सोनिया गांधी जबाबदार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
प्रणव मुखर्जी या पुस्तकात विश्लेषण करतात की, सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा वाईट पद्धतीने पराभव झाला. शासन करण्याचा नैतिक हक्क हा पंतप्रधानांचा असतो असे मी मानतो. राष्ट्राची संपूर्ण स्थिती पंतप्रधान आणि त्यांच्या प्रशासनाच्या कामकाजाला प्रतिबिंबित करते. डॉ. सिंह यांना आघाडीला वाचवण्याचा सल्ला देण्यात आला होता. हे शासनावर भारी पडले. आघाडीतील मंत्री निरंकुश झाले. त्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर बोलणारे कोणी राहिले नाही. त्यामुळेच कॉँग्रेसची देशात प्रचंड बदनामी झाली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App