प्रकाशसिंग बादल यांची पद्मविभूषण किताब वापसी; मोदींच्या वैयक्तिक मैत्रीला आले “फळ”

  • मोदी सरकारने शेतकऱ्यांना फसवले म्हणत केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांचा कडाडून निषेध

वृत्तसंस्था

चंडीगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक मैत्रीला पंजाबमधील शेतकरी आंदोलनातून “फळ” मिळाले आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी पद्मविभूषण हा किताब सरकारला परत करण्याची घोषणा केली आहे.

मोदी सरकारने शेतकऱ्यांना फसवले आहे. या गोष्टीचा मी तीव्र निषेध करतो असे म्हणत प्रकाशसिंग बादल यांनी पद्मविभूषण पुरस्कार परत करण्याची घोषणा केली. ते म्हणाले, की केंद्रातील मोदी सरकारने आणलेले कृषी कायदे जाचक आहेत. शेतकऱ्यांसाठी घातक आहेत.

या सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी देणे-घेणे नाही. याचा निषेध म्हणून मी पद्मविभूषण किताब सरकारला परत करण्याचा निर्णय घेतला आहे. अकाली दलाने कृषी कायद्यांचा निषेध नोंदवतच एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आता केंद्र सरकारवर टीका करत प्रकाश सिंह बादल यांनी त्यांचा पद्मविभूषण किताब परत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना २०१५ मध्ये हा किताब देण्यात आला होता.

पंजाबच्या निवजणुकीपूर्वी तेथील प्रदेश भाजपने अकाली दलाबरोबरची युती तोडण्यासंबंधीचा एक अहवाल मोदींकडे पाठविला होता. प्रदेश भाजपचे संपूर्ण युनिट अकाली दलाबरोबरची युती तोडून अमरिंदर सिंग यांच्याशी वेगळी युती करण्याच्या मनःस्थितीत होते. अमरिंदर सिंग देखील त्यावेळी काँग्रेस नेतृत्वावर नाराज होते.

पण मोदींची प्रकाशसिंग बादलांशी वैयक्तिक मैत्री आहे. त्यांच्या आग्रहाखातर स्थानिक भाजपच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या इच्छेविरोधात जाऊन अकाली दल आणि भाजपची युती टिकविण्यात आली. पंजाबमध्ये दोन्ही पक्षांच्या युतीचा पराभव झाला. कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर स्वतःच्या टर्मवर अकाली दल एनडीएमधून बाहेर पडले. मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी राजीनामा दिला आणि आता मोदींचे वैयक्तिक मित्र प्रकाशसिंग बादल यांनी पद्मविभूषण हा किताब सरकारला परत करून मोदींना वैयक्तिक “मैत्रीचे फळ” दिले आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात