पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियांच्या कार्यालयांवर छापे, दिल्ली हिंसाचारात सहभाग

अंमलबजावणी संचालनालयाने देशभरातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) कार्यालयांवर छापे टाकले. एकूण नऊ राज्यांत एकाच वेळी २६ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. यामध्ये केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, कर्नाटक, दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान यांचा समावेश आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: अंमलबजावणी संचालनालयाने देशभरातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) कार्यालयांवर छापे टाकले. एकूण नऊ राज्यांत एकाच वेळी २६ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. यामध्ये केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, कर्नाटक, दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान यांचा समावेश आहे. popular front of india news

बिहारमध्ये पीएफआयचे सरचिटणीस मोहम्मद सनाउल्लाह यांच्या घरावर छापा घालण्यासाठी दरभंगाच्या शंकरपूरला पोहोचलेल्या पथकाला परतताना ग्रामस्थांनी घेरलं. छाप्यामध्ये जप्त केलेल्या वस्तूंची यादी देण्याची मागणी त्यांनी केली. popular front of india news

सनाउल्लाह सध्या कोलकात्यात आहेत. याची माहिती मिळताच त्यांना कोलकात्यातील पीएफआय कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आले. बिहारमधील पूर्णिया येथील पीएफआय कार्यालयात मनी लाँड्रिंगबाबत चौकशी केली गेली. विदेशातून पैसे येत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.

उत्तर प्रदेशमधील लखनऊ आणि बाराबंकी येथे ईडीच्या पथकाने छापे टाकले. दिल्लीत झालेल्या दंगलीचे पीएफआय कनेक्शन उघडकीस आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती ईडीच्या कार्यालयाकडून देण्यात आली. या प्रकरणात लखनऊमधून अटक केलेला नदीम हा बाराबंकीचा रहिवासी आहे. त्याच्याशी संबंधित असलेल्यांचा शोध घेतला जातोय.

popular front of india news

हाथरस घटनेत मथुरा येथून पकडलेल्या पीएफआयच्या सदस्यांची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मथुरामध्ये पकडलेला सदस्य हा पीएफआयच्या दिल्ली युनिटमध्ये आहे. मथुरामध्ये अटक करण्यात आलेल्या चार आरोपींपैकी एक आरोपी दिल्ली युनिटचा अधिकारी आहे. तो केरळ आणि इतर राज्यांमधील सदस्यांच्या संपर्कात होता.

जयपूरमध्ये ईडीच्या पथकाने पीएफआय कार्यालयावर सुमारे ५ तास चौकशी केली. पथक गेल्यानंतर पीएफआयच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात