हवेचे प्रदूषण वाढल्याचा जागतिक तापमान वाढीवर परिणाम होत असतानाच अपत्य जन्मावरही त्याचा परिणाम होत असल्याचा अंदाज कॅलिफोर्निया सॅनफ्रान्सिस्को विद्यापीठातील संशोधकांनी व्यक्त केला आहे. हवेच्या प्रदूषणाचा गर्भवती महिलांच्या आरोग्यावर परिणाम होऊन २०१९ या वर्षात ५९ लाख बालकांचा नऊ महिने पूर्ण होण्याआधीच जन्म झाल्याचे आणि २८ लाख बालके कमी वजनाची जन्माला आल्याचे संशोधकांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.Pollution is now affecting newborns as well
संशोधकांनी २०४ देशांमधील माहिती गोळा करून प्रदूषणाच्या परिणामांबाबत अभ्यास केला आहे. प्रदूषणाचा गर्भवती महिलांवर परिणाम होऊन नऊ महिने पूर्ण होण्याआधीच अपत्यांचा जन्म होणे आणि त्यांचे वजन कमी असणे अशा समस्या निर्माण होत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. हवेच्या प्रदूषणासंदर्भात या समस्यांचा प्रथमच अभ्यास करण्यात आला आहे.
गर्भवती महिलांचा प्रदूषणापासून दूर ठेवता आले असते तर २०१९ मध्ये ५९ लाख बालकांचा मातेच्या पोटात नऊ महिने वाढ झाल्यानंतर जन्म झाला असता. तसेच, २८ लाख अपत्यांचे जन्मानंतरचे वजन योग्य राहिले असते, असे या अहवालात म्हटले आहे. दक्षिण आशिया आणि आफ्रिकेमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात असल्याचेही संशोधकांनी सांगितले. जन्मत:च बाळाचा मृत्यू होण्याचे जगात प्रमाण अधिक असून नऊ महिने पूर्ण होण्याआधीच होणारा जन्म हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे सिद्ध झाले आहे.
अशा परिस्थितीत हवेच्या प्रदूषणाचाही त्यावर परिणाम होत असल्यास ही गंभीर स्थिती असल्याचे अभ्यासकांनी सांगितले. अर्भकांच्या आणि कमी वयाच्या बालकांच्या मृत्युला हवेचे प्रदूषण कारणीभूत असल्याचे मान्य करणे आवश्ययक आहे, हे नवीन पुराव्यांवरून स्पष्ट होत आहे. प्रदूषणाचा त्रास केवळ अधिक वयाच्या व्यक्तींपुरता मर्यादित नाही. पर्यावरण बदलाचा वेग रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना वेग आल्यास त्याचा आरोग्यावरही सकारात्मक परिणाम दिसून येईल असे तज्ञांचे मत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App