एखाद्या आंदोलनात राजकीय घुसखोरी करणारे आम्ही पहिल्यांदाच पाहत आहोत. राममंदिर आंदोलनाच्यानिमित्ताने झालेल्या राजकीय घुसखोरीवर तुम्ही नक्की लिहिले पाहिजे, असा टोला भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : एखाद्या आंदोलनात राजकीय घुसखोरी करणारे आम्ही पहिल्यांदाच पाहत आहोत. राममंदिर आंदोलनाच्यानिमित्ताने झालेल्या राजकीय घुसखोरीवर तुम्ही नक्की लिहिले पाहिजे, असा टोला भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला आहे.
Political infiltration in Ram Mandir agitation, Ashish Shelar attack on Shiv Sena
भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भांडारी यांच्या अयोध्या या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मंगळवारी (दि. 23) मुंबईत पार पडला. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष मंगलप्रभात लोढा हे नेते उपस्थित होते.
यावेळी बोलताना शेलार म्हणाले की, या पुस्तकात काही लोकांचा उल्लेख केलाय. काही लोकांचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळण्यात आला आहे. हे दोन्ही संदर्भ अगदी खरे आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राम मंदिराची उभारणी कोणी करायची, हा प्रश्न काही लोक उपस्थित करत आहेत. मंदिर बांधण्यासाठी सरकारची आवश्यकता नाही. या मंदिराच्या निर्माणात लोकसहभाग महत्त्वाचा आहे. देशाला ज्या प्रभू श्रीरामाने एकत्र आणले, त्याचं मंदिर सगळे मिळून बांधतील. कोणाच्या पोटात कितीही दुखलं तरी चालेत, पण 2024 मध्ये तुम्हाला रामाचं दर्शन मिळेल.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून गोळा केल्या जाणाऱ्या राममंदिराच्या वर्गणीच्या मुद्द्यावरुन ज्यांच्या पोटात दुखत आहे, त्यांनीही वाटल्यास पैसे द्यावेत. त्यांनी पैसे गोळा केले तरी चालतील. याची त्यांना रितसर पावती दिली जाईल, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला. फडणवीस म्हणाले की,अयोध्या भूमी कमी होती का? जिथे रामलल्ला विराजमान होते तीच जागा का दिसली? खरंतर रामजन्मभूमीचं आंदोलन गेले अनेक शतकं सुरु होतं. 1528 साली बाबराचा सेनापती मीर बाकी याने अयोध्येचं राम मंदिर तोडून मशिद बांधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सातत्याने हे आंदोलन सुरु राहिलं.
ज्या लोकांना वाटतं हा केवळ मंदिर आणि मशिदीचा वाद आहे, त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की, हा केवळ जमिनीचा वाद नाही, असे फडणवीस म्हणाले. त्यांनी सांगितले की, एखाद्या समाजाला पराजित मानसिकतेत नेण्यासाठी त्याचा आत्मा मारावा लागतो. प्रभू रामचंद्र हे भारताचा आत्मा आहेत. त्यामुळेच ती जागा आक्रमणासाठी निवडली गेली. म्हणूनच फक्त मंदीर पाडून मज्जिद बांधायचे होते. आम्ही तुमच्या संस्कृतीचा आत्माच मिटवू शकतो हे त्याला दाखवून द्यायचं होतं. ही लढाई फक्त मंदिर-मशिदीची नव्हती. संस्कृतीवर करण्यात आलेल्या आक्रमणाचीही होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App