दक्षिण मुंबईतले माजी खासदार मिलिंद देवरा काँग्रेस पक्ष सोडून गेल्यानंतर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी, “एक मिलिंद देवरा गेला म्हणून काय झाले?, एक लाख मिलिंद देवरा पक्षात येतील!!,” असे उद्दाम वक्तव्य केले. त्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर जोरदार उमटली आहे. अनेकांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या परिवाराला त्यावरून कोसले आहे. वक्तव्य जयराम रमेश यांनी केले, पण ट्रोल गांधी परिवार झाला!!Political egos will be destroyed by the one and only!!
अर्थात हे जरी खरे असले, तरी जयराम रमेश यांचे वक्तव्य असे सहज हवेतून आलेले नाही किंवा एकच कुणीतरी नेता सोडून गेला असे वक्तव्य काही फक्त जयराम रमेश यांनीच केलेले नाही, तर अशीच कोणी एखादा पक्षातून गेला तर काय झाले? पक्ष रिकामा परत नाही, अकेला देवेंद्र काय करेगा क्या करेगा??, अशी अनेक अहंकारी वक्तव्ये विरोधी “इंडिया” आघाडीतल्या नेत्यांनी अनेकदा केलीच होती.
2019 चा जनमताचा कौल डावलून ज्यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार बनवले होते, त्यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी, “अकेला देवेंद्र क्या करेगा??”, असाच अहंकारी सवाल केला होता. त्याआधी देखील हेमंत विश्वशर्मा नावाचे नेते राहुल गांधींना भेटायला गेल्यानंतर त्यावेळी त्यावेळी राहुल गांधींनी आसाम काँग्रेसचे दुखणे देखील हेमंत विश्वशर्मा यांच्या तोंडून ऐकले नव्हते, उलट त्या ऐवजी त्यांनी आपल्या कुत्र्याला बोलवून बिस्किटे खायला घालणे पसंत केले होते.
हेमंत विश्वशर्मा त्यावेळी एकटेच राहुल गांधींना भेटले होते आणि कुत्र्याला बिस्किटे खाऊ घालण्याच्या प्रसंगानंतर ते एकटेच काँग्रेस बाहेर पडले होते, पण ते “एकटेच” बाहेर पडलेले हेमंत विश्वशर्मा नंतर काँग्रेसला आसाम मध्ये एवढे “भारी” पडले की त्यानंतर सलग दोन निवडणुकांमध्ये आसाम मध्ये काँग्रेस हरली आणि काँग्रेसनेच तयार केलेले नेतृत्व हेमंत विश्वशर्मा यांना भाजपने मुख्यमंत्री करून दाखविले.
2019 मध्ये पवार – ठाकरे यांनी जनमताचा कौल डावलून “एक अकेला” देवेंद्रला नक्कीच बाजूला सारून दाखवले होते, पण अवघ्या अडीच वर्षांत त्याच “एक अकेला” देवेंद्रने असा काही जमालगोटा दिला की ठाकरे – पवार सरकार तर गेलेच, पण ठाकरे – पवारांचे पक्ष देखील उभे फुटले आणि त्यावेळी एक अकेला देवेंद्र क्या करेगा??, असे म्हणणाऱ्या सुप्रियाताई आपल्या चुलत भावालाही आपल्या वडिलांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रोखून धरू शकल्या नाहीत.
आज मिलिंद देवरा एकटेच काँग्रेस बाहेर पडले तर त्यांना सावरून काँग्रेसमध्ये खेचून धरण्याऐवजी ते दोनदा खासदारकीच्या निवडणुकीत पडल्याचे नाना पटोले यांनी त्यांना हिणवले, पण ते एकटेच त्यावेळी पडले नव्हते, मोदी लाटेत अख्खी काँग्रेस त्यावेळी महाराष्ट्रात आडवी झाली होती, हे नाना पटोले विसरले.
या “एक अकेलाची” स्टोरी खुद्द पंतप्रधान मोदींनीच भर लोकसभेत सांगितले होती. काँग्रेसवर प्रहार करताना या काँग्रेसवाल्यांनी आणि विरोधकांनी एवढा भ्रष्टाचार केलाय की एक अकेला कितनोंपर भाडी पड रहा है देखो!!, असे मोदी लोकसभेत गरजले होते.
…आणि खरेच तर आहे, सगळी आदळ आपट तर एकट्या मोदींनाच तर हरवण्यासाठी सुरू आहे. त्यासाठी उभा भारत 3500 किलोमीटर फिरून झाला. आता आडवा भारत 6000 किलोमीटर फिरावा लागतो आहे, पण हरवायचे तर एकट्या मोदींनाच आहे, पण तेच जमेल की नाही, ही खरी शंका आहे. कारण जो चालणार आहे, तो काँग्रेस पक्षात आणि “इंडिया” आघाडीत एकटाच आहे. बाकीचे चाललेच तरी ते “झिलकरीच” आहेत!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App