अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या शताब्दी वर्षाला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे; शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल देखील हजर राहणार

वृत्तसंस्था

अलिगढ : देशातील जुन्या प्रख्यात अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी उमर सलीम पिरजादा यांनी एएनआय वृत्तसंस्थेला ही माहिती दिली.


२२ डिसेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ लिंकद्वारे सहभागी होऊन मार्गदर्शन करतील, असे पिरजादा यांनी स्पष्ट केले. त्याच बरोबर केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक हे देखील कार्यक्रमास उपस्थित राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यक्रमात सहभाही होण्यास अनुमती दिल्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. तारिक मन्सूर यांनी पंतप्रधानांचे विशेष आभार मानले आहेत. या शताब्दी वर्षात विद्यापीठाने जनमानसात अधिकाधिक पोहोचण्याचे उपक्रम हाती घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*