वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधानांच्या महत्वाकांक्षी काशी विश्वनाथ धामाच्या लोकार्पणानंतर देशातील सर्वात मोठ्या एक्स्प्रेस-वेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम प्रस्तावित आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी उत्तरप्रदेशातील शाहजहांपूर येथे गंगा एक्सप्रेस वेची पायाभरणी करतील ,असे त्यांच्या कार्यालयाने गुरुवारी सांगितले.PM Modi to lay foundation stone of Ganga Expressway in UP’s Shahjahanpur
PM Modi to lay the foundation stone of 594 km long Ganga Expressway in Shahjahanpur, UP on 18 Dec. The Expressway will be built at a cost of over Rs 36,200 cr. 3.5km long airstrip for assisting emergency take-off and landing of IAF planes to be constructed on the Expressway: PMO pic.twitter.com/3RWIzvH1ka — ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) December 16, 2021
PM Modi to lay the foundation stone of 594 km long Ganga Expressway in Shahjahanpur, UP on 18 Dec. The Expressway will be built at a cost of over Rs 36,200 cr. 3.5km long airstrip for assisting emergency take-off and landing of IAF planes to be constructed on the Expressway: PMO pic.twitter.com/3RWIzvH1ka
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) December 16, 2021
594 किमी लांबीचा सहा लेन एक्स्प्रेस वे 36,200 कोटी रुपये खर्चून बांधला जाईल, असे पंतप्रधान कार्यालयाने ( पीएमओ ) एका निवेदनात म्हटले आहे.
गंगा एक्स्प्रेस-वे हा देशातील सर्वाधिक लांबीचा मार्ग ठरण्याची शक्यता आहे. मेरठ ते प्रयागराज विस्तार असलेला महामार्ग विक्रमी वेळेत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
गंगा एक्स्प्रेस-वे मुळे प्रयागराजवरुन दिल्ली केवळ दोन तासांत गाठता येणार आहे.
18 डिसेंबर रोजी शाहजहांपूर येथे दुपारी 1 वाजता पायाभरणी केली जाईल.
एक्स्प्रेस वेमागील प्रेरणा म्हणजे देशभरात जलद गतीने कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्याची पंतप्रधानांची दृष्टी आहे, असे पीएमओने म्हटले आहे.
मेरठमधील बिजौली गावाजवळून सुरू होणारा हा एक्स्प्रेस वे प्रयागराजमधील जुडापूर दांडू गावापर्यंत असणार आहे.
हवाई दलाच्या विमानांच्या आपत्कालीन टेक ऑफ आणि लँडिंगसाठी 3.5 किमी लांबीची हवाई पट्टी देखील शाहजहानपूरमधील एक्सप्रेस वेवर बांधली जाईल, असे त्यात म्हटले आहे.
एक्स्प्रेस वेच्या बाजूला इंडस्ट्रियल कॉरिडॉर बनवण्याचाही प्रस्ताव आहे.
एक्स्प्रेस वे औद्योगिक विकास, व्यापार, कृषी, पर्यटन इत्यादीसह अनेक क्षेत्रांना चालना देईल, असे निवेदनात म्हटले आहे.
यातून उत्तर प्रदेशाच्या सामाजिक आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App