उत्तम आरोग्यसेवा, चांगले शिक्षण, शेतकऱ्यांना योग्य माहिती आणि संधी, छोट्या व्यवसायांसाठी चांगल्या बाजारपेठेत प्रवेश ही काही उद्दिष्टे सरकारपुढे आहेत ज्यासाठी आपण आगामी तंत्रज्ञान क्रांतीच्या बळावर एकत्र काम करू शकू, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. pm modi latest news
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : उत्तम आरोग्यसेवा, चांगले शिक्षण, शेतकऱ्यांना योग्य माहिती आणि संधी, छोट्या व्यवसायांसाठी चांगल्या बाजारपेठेत प्रवेश ही काही उद्दिष्टे सरकारपुढे आहेत ज्यासाठी आपण आगामी तंत्रज्ञान क्रांतीच्या बळावर एकत्र काम करू शकू, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. pm modi latest news
पंतप्रधानांच्या हस्ते टेलीकॉम 2020 चे उदघाटन झाले. या वेळी बोलताना मोदी म्हणाले, चीनी व्हायरसच्या काळात एकमेकांपासून लांब राहून देखील नागरिक व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आणि टेक्नॉलॉजीच्या मदतीने एकमेकांशी जोडलेले होते. यामध्ये विद्यार्थी घरी बसून अभ्यास करू शकतो तर डॉक्टर देखील लॅबमध्ये राहून आपल्या रुग्णाला तपासू शकतात. भारत जगातल्या टेलिकॉम उद्योगाच्या अग्रस्थानी असेल. टेलिकॉम हब म्हणून देशाचं नाव होईल. pm modi latest news
भारतात लवकरच ५ जी टेक्नॉलॉजी सुरू केली जाईल. या व्यतिरिक्त, डिजिटल मिशनअंतर्गत भारतातील प्रत्येक गाव आणि शहर डिजिटल करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. याता संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, डिजिटल व्यवस्थेमुळे देशात ऐतिहासिक बदल झाला आहे. गावं आणि शहरं यांचे एकत्रीकरण होणार आहे.
सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय मोदीच; ३३६ कोटी रुपये ब्रँड व्हॅल्यू
भारतातील आयटी इंडस्ट्री इंडस्ट्री नवीन स्तरावर पोचवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. टेक्नॉलॉजीच्या मदतीने राहणीमान सुधारण्यावर भर घालण्यात आला आहे. आयटी, टेक क्षेत्रातील क्षमता वाढविण्याचे काम सुरू झाले आहे.
प्रत्येक गावात हायस्पीड फायबर कनेक्टिव्हिटची प्रयत्न सुरू आहेत. इलेक्ट्रॉनिक वेस्टसाठी टास्क फोर्स तयार करणार असून भारत टेलिकॉम उपकरणे बनवण्याचे केंद्र बनू शकते. भारत लवकरच टेलिकॉम उपकरणे, विकास व उत्पादन व डिझाईन सेंटर बनवण्याचे काम करेल
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App