कृषि कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन राजकीयदृष्टया प्रेरीत असून आता मागे घ्यावे, असे मत देशातील बहुतांश नागरिकांनी व्यक्त केले आहे. नव्या सुधारणांमुळे शेतकऱ्यांचा फायदाच होणार आहे, असे जनता लोक म्हणत असल्याचे न्यूज १८ नेटवर्कने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कृषि कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन राजकीयदृष्टया प्रेरीत असून आता मागे घ्यावे, असे मत देशातील बहुतांश नागरिकांनी व्यक्त केले आहे. नव्या सुधारणांमुळे शेतकऱ्यांचा फायदाच होणार असल्याचेही लोक म्हणत असल्याचे न्यूज १८ नेटवर्कने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.
People say that the farmers movement is political, it is time to stop it now
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 62 टक्के लोकांना वाटतं की आता आंदोलन थांबवलं पाहिजे तर 61 टक्के लोक नव्या कृषी कायद्यांना पाठिंबा देतात. 54 टक्के लोकांना वाटतं की हे आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे. शेतकऱ्यांनी कृषी कायदे मागे घेतले जावेत असा आग्रह करू नये असे 59 टक्के लोकांना वाटत आहे. 67 टक्के लोकांना वाटतं की नव्या कृषी कायद्यांतर्गत शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू शकतो. 72 टक्के लोक शेतीच्या आधुनिकीकरण आणि सुधारणांना पाठिंबा देतात. 75 टक्के लोक शेतकऱ्यांना बाजार समितीबाहेर उत्पादनं विकण्याचा पर्याय देण्याचं स्वागत करतात. 59 टक्के लोकांनी एमएसपी व्यवस्था तशीच राहिल या पंतप्रधानांच्या लेखी आश्वासनाला पाठिंबा दिला आहे.
तुम्ही शेतकऱ्यांना बाजार समितीबाहेर उत्पादनं विकण्याचा पर्याय देण्याचं समर्थन करता का? नव्या कायद्यांमुळे व्यापक निर्णयक्षेत्र मिळाले तर शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांची चांगली किंमत मिळेल असे तुम्हाला वाटते का? जे दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत ते नव्या कृषी सुधारणा कायद्यांना पूर्णत: मागे घेण्यास सांगत आहेत. आंदोलक म्हणत आहेत, की ते याहून कमी कशावर राजी होणार नाहीत. याला तुमचं समर्थन आहे का? आता आंदोलन थांबवण्याची वेळ आली आहे का? आदी प्रश्न या सर्वेक्षणात विचारण्यात आले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App