Patiala Urban Captain Amarinder Singh Result Live: CAPTAIN OUT ! पटियाला अर्बनमधून कॅप्टन अमरिंदर सिंग पराभूत – आपचे उमेदवार अजित पाल कोहली जिंकले
विशेष प्रतिनिधी
पटियाला : माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग पंजाबच्या पटियाला अर्बन (पटियाला शहरी निकाल) विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, त्यांचा आपचे उमेदवार अजित पाल सिंह कोहली यांच्याकडून पराभव झाला आहे.Patiala Urban Captain Amarinder Singh Result Live: CAPTAIN OUT !
पटियाला अर्बन हा पंजाबमधील 117 विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे. 2017 मध्ये, पतियाळा शहरी विधानसभा मतदारसंघ अमरिंदर सिंग यांनी जिंकला होता. मात्र यावेळी त्यांचा पराभव झाला.
पंजाब विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील सर्वात हॉट सीट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पटियाळा शहरी मतदारसंघाचा निकाल आला आहे.
कॅप्टनचा पराभव करणारे अजित पाल सिंह कोहली हे शिरोमणी अकाली दलाच्या जुन्या ‘निष्ठावान’ कोहली घराण्याचे पुत्र आहेत. मात्र यावेळी त्यांनी एसएडी सोडून आम आदमी पक्षात प्रवेश करून सर्वांना आश्चर्यचकित केले. तीन वेळा आमदार सरदारा सिंह कोहली यांच्यानंतर त्यांचा मुलगा सुरजित कोहली दोन वेळा आमदार आणि एकदा एसएडी चे मंत्री होते.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांना कोणी दिले आव्हान?
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये काँग्रेसने मुख्यमंत्री पदावरून हटवल्यानंतर, पटियालाचे विद्यमान आमदार कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांच्या नव्याने स्थापन झालेल्या पंजाब लोक काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली. अमरिंदर यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार विष्णू शर्मा आणि आपचे उमेदवार अजित पाल सिंह कोहली होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App