नाशिक – भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे खरेच नाराज आहेत की मराठी माध्यमांचीच मुद्दाम राजकीय काड्या घालण्याचे प्रकार सुरू आहे, असा प्रश्न तयार झाला आहे. कारण मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यापासून पंकजा मुंड़े नाराज असल्याच्या बातम्या मराठी माध्यमे चालवताना दिसत आहेत. त्या बेडकी फुगल्यासारख्या out of proportion चालविल्या जात आहेत. Pankaja munde is being targeted by marathi media, by hyper reporting of her so called unhappiness over modi cabinet reshuffle
एरवी ज्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांची नावे ते निवडून आले तेव्हा देखील ज्या मराठी माध्यमांनी छापली नव्हती किंवा दाखविली नव्हती, त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या नावांसकट छापण्यात येत आहेत. आणि वरती त्याला पंकजा मुंडे यांच्या नाराजीचे मोठ्ठे ठिगळ लावले जात आहे.
पंकजा मुंडे दिल्लीला ज्या राष्ट्रीय चिटणीसांच्या बैठकीला गेल्या होत्या. त्या राष्ट्रीय चिटणीसांची बैठक पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी एक दोन नव्हे, तर ६ तास चालली. ११ राष्ट्रीय चिटणीसांशी मोदींनी व्यक्तिगत संवाद साधला. यामध्ये सुनील देवधर, विजया रहाटकर, विनोद तावडे आणि पंकजा मुंडे हे होते. ही बातमी द फोकस इंडिया याच बेवपोर्टलने चालविली आहे. बाकीच्या मराठी मेनस्ट्रीम माध्यमांना या बातमीचा मागमूसही लागलेला नाही. राष्ट्रीय चिटणीसांना पंतप्रधान मोदी ६ तास देतात. त्यात नेमके काय झाले असेल, हे विचारायचे भानही मराठी माध्यमांमध्ये मिशा फेंदारून बसणाऱ्या पत्रकार – संपादकांना राहिले नाही. पण त्यांनी पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या बेडकी फुगावी तशा चालविल्या आहेत. जणू काही पंकजा मुंडे नाराज झाल्याने केंद्रातल्या मोदी सरकारला राजकीय सुरूंग लागणार आहे…!!
पंतप्रधान मोदी इतर राष्ट्रीय चिटणीसांशी बोलले तसे ते पंकजा मुंडे यांच्याशीही बोलले असणार. पण पंकजांनी घातली असेल का त्यांच्या कानावर नाराजी…?? जर त्या तसे बोलल्या असतील तर मोदींनी त्यांना कसा प्रतिसाद दिला असेल…?? हे विचारायचे मराठी माध्यमांना सूचलेही नाही. कारण मराठी माध्यमांची तेवढी “पोहोच” उरलेली नाही. मोदी किंवा भाजपवाल्यांना आडवे घालणारे प्रश्न ते विचारूच शकत नाहीत कारण त्यांच्याकडे तेवढ्या ऑथेंटिक माहितीचा साठाच कोणी भाजपवाले मिळू देत नाहीत.
मराठी माध्यमांची खरी अडचण ही आहे. मोदी आणि वरच्या भाजपवाल्यांनी त्यांच्या राजकीय बातमीदारीची नसबंदी करून टाकली आहे. मग अशा नसबंदीतून पंकजा मुंडे नाराज असल्याच्या आणि त्यांच्या समर्थकांच्या बातम्या out of proportion म्हणजे बेडकी फुगल्यासारख्या चालवाव्या लागतात.
आजची बीड – पाथर्डीची बातमीही तशीच चालविली गेली आहे. बीडनंतर नगरच्या पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील समारे ३० ते ३५ समर्थकांनी विविध पदांचे राजीनामे पक्षाकडे दिले आहेत. तर पाथर्डीतून ‘लोकनेते गोपीनाथ मुंडे पाथर्डी तालुका विकास आघाडी’ स्थापन करण्याचा पर्यायही कार्यकर्त्यांनी सूचविला आहे. ही ती बातमी आहे.
पण असले उद्योग मोदी – शहा – नड्डांच्या भाजपमध्ये करायला पंकजा मुंडेंना राजकीय वेड लागले आहे काय…?? मराठी माध्यमे “काडी घालीगिरी” जरूर करतील पण पंकजांचे राजकीय करिअर ते पुन्हा उभे करून देऊ शकतील काय…?? ३० वर्षे पंतप्रधानपदाच्या हेडलायनी करून मराठी माध्यमे मराठी नेत्याला पंतप्रधान करू शकली आहेत काय…?? याचा विचार पंकजा मुंडे करतील, अशी आशा आहे. कारण मोदींबरोबर त्यांचा काल थेट संवाद झाला आहे… आणि ही बातमी खरी आहे…!!
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App