
- राज्यात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे ऑक्सिजनची मागणी केली. त्यानंतर रेल्वेकडून खास ऑक्सिजन एक्सप्रेस देण्यात आली आहे. महाराष्ट्राला विशाखापट्टणम, जमशेदपूर, राऊरकेला आणि बोकारो इथून ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे.
विशेष प्रतिनिधी
गांधीनगर : महाराष्ट्रात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. म्हणूनच केंद्र सरकारकडून शक्य होईल तेथून ऑक्सिजन उपलब्ध करून दिले जात आहे.आता केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी महाराष्ट्रासाठी गुजरातमधून ऑक्सिजन एक्स्प्रेस निघाल्याची माहिती ट्विटर वरून दिली आहे .Oxygen express coming from Gujrat for Maharashtra
केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “गुजरातमधील हापा येथून महाराष्ट्रातील कळंबोलीसाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन घेऊन एक ऑक्सिजन एक्स्प्रेस निघाली आहे. ही एक्स्प्रेस ट्रेन महाराष्ट्रातील ऑक्सिजनच्या उपलब्धतेला वाढवेल. त्यामुळे कोरोना विरुद्धची लढाई लढण्यास मदत होईल.”
गुजरात के हापा से महाराष्ट्र के कलंबोली के लिए, लिक्विड मेडिकल ऑक्सीजन लेकर एक ऑक्सीजन एक्सप्रेस चल पड़ी है।
यह एक्सप्रेस ट्रेन महाराष्ट्र में ऑक्सीजन की उपलब्धता को बढ़ाएगी, जिससे कोरोना के खिलाफ लड़ाई में सहायता मिलेगी। pic.twitter.com/Iw4qtlnJQT
— Piyush Goyal (मोदी का परिवार) (@PiyushGoyal) April 25, 2021
5 दिवसात 110 मेट्रिक टन द्रवरुप ऑक्सिजन
पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस नागपूरमध्ये दाखल झाली. विशाखापट्टणम स्टील प्लॅट सायडींगमधून लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या 7 (एलएमओ) टँकर्ससह रो-रो सेवेद्वारे ऑक्सिजन एक्सप्रेस आली होती. त्यातील 3 टँकर नागपूरमध्ये तर उर्वरित नाशिकला देण्यात आलेत. ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या माध्यमातून 5 दिवसात 110 मेट्रिक टन द्रवरुप ऑक्सिजनचा पुरवठा महाराष्ट्राला होणार आहे. यापुढील काळात ऑक्सिजनच्या निरंतर पुरवठ्यासाठी रेल्वेच्या मदतीने आणखीन ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ चालविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे ऑक्सिजन तुटवड्यावर मात करणे शक्य होणार आहे.
कल शाम लिक्विड मैडिकल ऑक्सीजन लेकर हापा, गुजरात से चली #OxygenExpress मुंबई पहुंच चुकी है, इससे ऑक्सीजन की सप्लाई में बढोत्तरी होगी, और कोरोना संक्रमित लोगों के उपचार में सहायता मिलेगी।
भारतीय रेल ऑक्सीजन आपूर्ति को सुचारू और सुनिश्चित करने में अपना पूर्ण सहयोग प्रदान कर रही है। pic.twitter.com/nm1sB4pHd1
— Piyush Goyal (मोदी का परिवार) (@PiyushGoyal) April 26, 2021
Oxygen express coming from Gujrat for Maharashtra
Array