मेंदूचा शोध व बोध : अनुभवानुसार बदल करतो आपला मेंदू


पूर्वी असा समज होता की, मेंदूची सर्व जडणघडण बालवयातच होते, ठरावीक वयानंतर मेंदूमध्ये कोणतेही बदल होत नाहीत. पण हा समज चुकीचा आहे. आपला मेंदू त्याला मिळणाऱ्या अनुभवानुसार बदलत असतो, असे अनेक प्रयोगांतून सिद्ध होत आहे. लंडनमधील टॅक्सीचालकांना गाडी चालवताना अनेक रस्ते लक्षात ठेवावे लागतात. आपल्या मेंदूतील दिशाविषयक स्मरणशक्तीशी निगडित भाग आता मोजता येतो. मेंदू संशोधकांनी या चालकांच्या मेंदूतील असा भाग मोजून ठेवला.Our brain changes according to experience

तसेच त्याच वयाच्या, पण नियमित गाडी न चालवणाऱ्या माणसांच्या मेंदूतीलही हा भाग मोजून ठेवला. चार वर्षांनी पुन्हा दोन्ही गटांतील माणसांच्या मेंदूचे परीक्षण केले असता टॅक्सीचालकांच्या गटातील दिशाविषयक स्मृतीचा मेंदूतील भाग रोज गाडी न चालवणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत अधिक विकसित झालेला आढळला. म्हणजेच मेंदूच्या ज्या भागाला अधिक काम करावे लागते, तो अधिक विकसित होतो. जे काम करावे लागत नाही, तो मेंदूतील भाग बदलतो. या गुणधर्माला न्यूरोप्लास्टिसिटी असे म्हणतात.

माणूस जो अनुभव घेतो, जे काही काम करतो, त्याचा परिणाम त्याच्या मेंदूवर होतो आणि त्यामुळे मेंदूत रचनात्मक बदल होतात. अशा रचनात्मक बदलांमुळे त्या माणसाचे व्यक्तिमत्त्व बदलते. त्यामुळे या बदलांना ट्रेट्स चेंज म्हणतात. याउलट मेंदूतील काही बदल हे तात्कालिक असतात. त्या बदलांनुसार मनाची त्या वेळची स्थिती बदलत असते. पण त्यामुळे स्वभाव बदलत नाही. या बदलांना स्टेट्स चेंज म्हणतात. शिथिलीकरण किंवा स्वयंसूचना यांमुळे असे तात्कालिक बदल होतात,

त्या वेळच्या भावना बदलतात; पण स्वभाव बदलत नाही. माणसाने साक्षीध्यानाच्या सरावाने सतत प्रतिक्रिया करणे कमी केले, की मेंदूत रचनात्मक बदलही होतात. त्यामुळे त्याचा स्वभावही बदलू शकतो. त्यामुळे आता तर असे सांगितले जाते की वृद्ध व्यक्तींनीही घरात थोडे फार काम नियमित केली पाहिजेत. अशा प्रकारे काम केल्याने मेंदूला तल्लख राहण्यास नक्कीच मदत होते. शिवाय त्यामुळे वृद्धत्वातही स्मरणशक्ती चांगली राहते.

Our brain changes according to experience

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण