जगभरात अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणारा ऑस्कर (Oscar 2022) पुरस्कार सोहळा तब्बल तीन वर्षांनंतर पार पडतोय.
लॉस एंजिलिसमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडत असून दिग्गज कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली आहे.
या पुरस्कार सोहळ्यादरम्यान अभिनेता विल स्मिथची सूत्रसंचालक क्रिस रॉक याला कानशिलात लगावली …Oscar 2022: The sound of slapping! Discussion of ‘that’ slap at Oscar ceremony … Will Smith slapped host Chris Rock ….
वृत्तसंस्था
लॉस एंजिलिस : आज न भूतो न भाविष्यती असच काहीसं घडलय जगभरात अत्यंत प्रतिष्ठित ऑस्कर (Oscar 2022) पुरस्कार सोहळ्यादरम्यान. हा सोहळा तब्बल तीन वर्षांनंतर पार पडतोय. लॉस एंजिलिसमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडत असून दिग्गज कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली आहे. या पुरस्कार सोहळ्यादरम्यान अभिनेता विल स्मिथची सूत्रसंचालक क्रिस रॉक याच्याशी बाचाबाची झाली. Oscar 2022: The sound of slapping! Discussion of ‘that’ slap at Oscar ceremony … Will Smith slapped host Chris Rock ….
क्रिस रॉकने विलच्या पत्नीवर कमेंट केली. त्यामुळे भडकलेल्या विलने मंचावर जाऊन क्रिस रॉकच्या कानशिलात लगावली. G.I. Jane या चित्रपटावरून क्रिस रॉकने विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथची खिल्ली उडवली. जेडाच्या टक्कल वरून रॉकने मस्करी केली. जेडाला टक्कल असल्यामुळेच तिला चित्रपटातील भूमिका मिळाली, असं तो म्हणाला. पत्नीची केलेली ही मस्करी स्मिथला अजिबात आवडली नाही. भर पुरस्कार सोहळ्यात मंचावर जात त्यांनी क्रिसच्या कानशिलात लगावली…
VIA JAPANESE TELEVISION: The uncensored exchange between Will Smith and Chris Rock pic.twitter.com/j0Z184ZyXa — Timothy Burke (@bubbaprog) March 28, 2022
VIA JAPANESE TELEVISION: The uncensored exchange between Will Smith and Chris Rock pic.twitter.com/j0Z184ZyXa
— Timothy Burke (@bubbaprog) March 28, 2022
घडलेला हा प्रकार पाहून सोहळ्यातील उपस्थितांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला आणि काही क्षणांसाठी तिथे शांतता पसरली. पुन्हा माझ्या पत्नीचं नाव तुझ्या तोंडून घेऊ नकोस, असा इशारा विलने क्रिसला दिला.
विल स्मिथला ऑस्कर
विल स्मिथला यावर्षी त्याच्या किंग रिचर्ड या चित्रपटासाठी ऑस्करचं नामांकन मिळालं होतं. याच चित्रपटातील दमदार भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. टेनिस खेळाडू सेरेना विलियम्स आणि वीनस विलियम्स यांचे वडील रिचर्ड विलियम्स यांची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर विल भावूक झाल्याचं पहायला मिळालं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App