कर्नाटकात गोहत्याबंदी कायदा लागू करण्यासाठी आता अध्यादेश


मुख्यमंत्री बी. एस. येडीयूरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने राज्यात गोहत्या रोखण्यासाठी विधानसभेत विधेयक मांडले होते आणि ते मंजूर करून घेतले होते.

विशेष प्रतिनिधी

बंगळुरू : कर्नाटकात गोहत्याबंदी कायदा लवकरच लागू होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने त्यासाठी पावले उचलली आहेत.राज्यात गोहत्याबंदी विधेयक लागू करण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. Ordinance now to implement the Cow Slaughter Act in Karnataka

परंतु, त्यास विधानपरिषदेने अद्याप मान्यता दिली नाही. एकदा ती मिळाली की राज्यात गायींच्या कत्तलीवर बंदी घातली जाणार आहे.
राज्य विधानसभेने विधेयकाला काही दिवसांपूर्वी मंजुरी दिली होती.

Ordinance now to implement the Cow Slaughter Act in Karnataka

मुख्यमंत्री बी. एस. येडीयूरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने राज्यात गोहत्या रोखण्यासाठी विधानसभेत विधेयक मांडले होते आणि ते मंजूर करून घेतले होते. परंतु सरकारने हे विधेयक कोणत्याही चर्चेशिवाय सादर केले. त्यावर कोणतीही चर्चा घडवून आणली नाही, असा आरोप विरोधी पक्ष नेते सिद्धरामय्या यांनी केला. तसेच विधेयकाच्या प्रती दिल्या नसल्याचे सांगितले होते. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी उडाली होती.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण