विशेष प्रतिनिधी
भाजपची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक नाशिकमध्ये झाली आणि त्यामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे गट या दोघांच्या युतीतून महाराष्ट्र विधानसभेत 200 जागा निवडून आणण्याचे टार्गेट म्हणजे लक्ष्य भाजपने ठेवले. वास्तविक आम्ही पुढच्या निवडणुकीत 200 जागा निवडून आणू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यावरच्या पहिल्याच विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी विधानसभेत सांगितले होतेच. त्यावर भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीने नाशकात शिक्कामोर्तब केले एवढेच!!Only BJP eyes 200 seats in maharashtra, but Congress, NCP Shivsena factions keep target of only 100 seats below 145 majority mark
पण हा विषय शिक्कामोर्तबा एवढाच मर्यादित नाही. तो त्या पलिकडचा आहे. भाजपने शिंदे गटाबरोबर युती करून ज्या अर्थी 200 जागा निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे, त्या अर्थी भाजप स्वतःच्या बळावर महाराष्ट्रात 150 जागा निवडून आणण्याची महत्त्वाकांक्षा ठेवणारा आता एकमेव राष्ट्रीय पक्ष उरला आहे. हे या महत्त्वाकांक्षेतले बडे राजकीय इंगित आहे आणि याकडे कोणाचे लक्ष नाही.
भाजपने 200 जागांचे लक्ष्य ठेवल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी देताना हा शिंदे गटाला इशारा असल्याचे विश्लेषण केले आहे. भाजपने महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणली की शिंदे गटाची त्यांना गरज राहणार नाही हे शिंदे गटाने ओळखावे असाच मराठी माध्यमांचा होरा दिसतो आहे. पण त्या पलिकडे जाऊन भाजपच्या 150 आणि युतीच्या 200 जागांच्या लक्षात लक्ष्याची चिकित्सा कोणी केलेली दिसत नाही.
– 1990 मध्ये काँग्रेसची शेवटची शंभरी
मूळात काँग्रेस आणि भाजप असे दोन राष्ट्रीय पक्ष महाराष्ट्रात त्यांच्या ताकदीने उभे राहिलेले असताना हे दोनच पक्ष असे आहेत ज्यांनी विधानसभा निवडणुकीत कधी ना कधीतरी शंभरी ओलांडली आहे. आता ही शंभरी ओलांडण्याची क्षमता फक्त भाजपमध्ये उरली आहे. काँग्रेसने ही क्षमता केव्हाच गमावली आहे. 1990 मध्ये काँग्रेस अखंड असताना काँग्रेसने शेवटी शेवटची शंभरी गाठली होती आणि हाताचा पंजा या निवडणूक चिन्हावर 141 आमदार निवडून आणले होते. त्यानंतर हाताचा पंजा या निवडणूक चिन्हावर काँग्रेसने आज पर्यंत म्हणजे 2024 च्या निवडणुकीपर्यंत शंभरी गाठलेली नाही.
– भाजपची दोनदा किमया, 150 मतांचे टार्गेट
भाजपने शंभरी गाठण्याची किमया 2014 आणि 2019 या सलग दोन निवडणुकांमध्ये करून दाखवली आहे आणि त्यामुळेच पक्षाच्या नेत्यांचा राजकीय कॉन्फिडन्स वाढला आहे. शतप्रतिशत भाजप ही घोषणा देऊन आता दशकभराचा काळ लोटला आहे. काही राज्यांमध्ये ही ही घोषणा प्रत्यक्ष अस्तित्वात देखील आली आहे. उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक ही त्याची उदाहरणे आहेत. महाराष्ट्रात हे उदाहरण होता होता 2014 आणि 2019 या निवडणुकांमध्ये राहून गेले. महाराष्ट्रात भाजपने दोनदा शंभरी ओलांडली असली तरी बहुमताचा 145 चा आकडा या दोन निवडणुकांमध्ये गाठण्यात भाजप थोडा कमी पडला. पण आता हीच कमी भरून काढण्यासाठी भाजपचे टॉप टू बॉटम नेते आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत. त्यासाठी बूथ लेवल आणि पन्ना प्रमुख या कार्यकर्त्यांना प्रत्येक बुथवर किमान 150 खात्रीचे मतदार वाढविण्याचे टार्गेट दिले आहे. याचा अर्थ भाजपची मते मिळवण्याची रेस प्रत्येक बूथ वर 150 मतांपासूनच सुरू होणार आहे. जी इतर पक्षांसाठी 0 मतापासून सुरू होते. याचा अर्थ भाजपने स्वतःचे घेतलेले टार्गेट ठरवलेले लक्ष्य हे याचा स्टार्टिंग पॉईंट 150 मतांनीच सुरू होतो, हे बाकीच्या कोणत्याही पक्षाने अद्याप तरी लक्षात घेतलेले नाही. मराठी माध्यमांचेही या महत्त्वाच्या मुद्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे भाजपचे 150 जागांचे लक्ष आणि युतीचे 200 जागांचे लक्ष हा शिंदे गटाला इशारा असल्याची राजकीय गल्लत मराठी माध्यमांनी केली आहे.
– राष्ट्रवादी, शिवसेनेच्या तोकड्या महत्त्वाकांक्षा
यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, शिवसेना दोन्ही गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी शंभरी गाठण्याची महत्त्वाकांक्षा देखील कधी बाळगलेलीच नाही. यातल्या प्रत्येक पक्षाला सत्तेवर यायचे आहे. मुख्यमंत्रीपद मिळवायचे आहे. पण विधानसभा निवडणुकीत शंभरी गाठण्याचे स्वप्नही हे पक्ष बघत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिवेशनात केलेल्या ठरावात महाराष्ट्रात 100 जागा निवडून आणण्याचे लक्ष ठेवले आहे. याचा अर्थ मूळातच बहुमताच्या पेक्षा कमी तब्बल 45 जागांचा तोटा राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या मूळ लक्ष्यामध्येच ठेवला आहे. याचा अर्थ परीक्षेत 100 पैकी 35 गुण मिळवणे हे पास होण्यासाठी अनिवार्य असताना 25 किंवा 30 गुण मिळवण्याचे लक्ष्य ठेवण्यासारखे हे झाले आहे!! राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाला म्हणजे शरद पवारांना आपला पक्ष बहुमत महाराष्ट्र विधानसभेत संपूर्ण बहुमत मिळविण्याचे लक्ष्य का ठेवत नाही??, हा प्रश्न कोणी विचारत नाही. त्यामुळे ते त्याचे उत्तर देत नाहीत. फक्त आपल्याकडे आकडेवारी नाही त्यामुळे पंतप्रधानपद आणि मुख्यमंत्रीपद यावर चर्चा करण्यात मतलब नाही असे ते पत्रकार परिषदांमध्ये सांगतात. पण प्रत्यक्षात या महत्त्वाकांक्षा लपून राहत नाहीत. दुसऱ्या तिसऱ्या फळीतले नेते आणि कार्यकर्ते यांच्या मुखातून या महत्त्वाकांक्षा वारंवार बाहेर पडत राहतात पण निवडणुकीत बहुमताचे लक्ष्य कायमच शंभरीच्या आत राहते.
– भाजप पुढचे खरे आव्हान “75” चे!!
या पार्श्वभूमीवर भाजपने युतीतून 200 जागा निवडून आणण्याचे लक्ष ठेवणे आणि स्वबळावर 150 जागा निवडून आणण्याची महत्त्वकांक्षा बाळगणे याला विशेष महत्त्व आहे. यात भाजप पुढे एक महत्त्वाचे आव्हान आहे, ते म्हणजे भाजपला 200 उमेदवारांची गरज आहे. यातले 125 उमेदवार भाजपकडे तयार असू शकतात. कारण 2014 च्या निवडणुकीत तो आकडा त्यांनी आधीच गाठला आहे. 106 चा आकडा 2019 च्या निवडणुकीत गाठला आहे. त्यामुळे 125 उमेदवार मिळवणे भाजपसाठी फार मोठे आव्हान नाही. पण त्यापलिकडचे 75 उमेदवार आणि त्यातही विजयाचे सगळे निकष पार करणारे उमेदवार मिळवणे हे भाजपसाठी मोठे आव्हान आहे. या आव्हानातच काँग्रेस आणि राष्ट्रवादी किंवा अन्य छोट्या पक्षांच्या साठी देखील एक वेगळे आव्हान उभे राहिले आहे. ते म्हणजे त्यांच्या पक्षाच्या विजयाची क्षमता उरलेल्या नेत्यांना आपल्याच पक्षात टिकवून ठेवणे हे ते आव्हान आहे!! कारण भाजप अशाच विजयाची क्षमता असलेल्या नेत्यांवर केव्हाही कोणत्याही प्रकारे गळ टाकू शकतो, ही मूळात काँग्रेस, राष्ट्रवादी ठाकरे गट या पक्षांच्या नेतृत्वाला भीती आणि काळजी असली पाहिजे. पण त्याविषयी हे पक्ष अथवा मराठी माध्यमे चकार शब्दही काढताना दिसत नाहीत. याचा अर्थ भाजपने 200 जागांचे लक्ष्य ठेवणे म्हणजे नेमके काय आहे??, हेच काँग्रेस – राष्ट्रवादी सारख्या पक्षांना आणि मराठी माध्यमांना समजले नाही, हेच यातून स्पष्ट होते!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App