OIC : OIC बैठकीत पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान म्हणाले जगभरात इस्लामोफोबियासाठी मुस्लिम देशच जबाबदार !

इस्लामाबादमध्ये सुरू झालेल्या ओआयसीच्या बैठकीत इम्रान खान यांनी इस्लामोफोबियासाठी मुस्लिम देशांना जबाबदार धरले आहे. 

9/11 च्या हल्ल्यानंतर त्यात वाढ झाल्याचे ते म्हणाले. 


विशेष प्रतिनिधी

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये इस्लामिक सहकार्य संघटनेच्या ४८व्या सत्राची दोन दिवसीय बैठक आजपासून सुरू झाली आहे. ओआयसीच्या सत्राचे उद्घाटन करताना, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान वाढत्या इस्लामोफोबिया आणि दहशतवादाबद्दल बोलले आहेत .त्यांनी सदस्य देशांना विचारले की इस्लामची दहशतवादाशी तुलना का केली जाते? त्याचवेळी त्यांनी नाराजी व्यक्त करत इस्लामची प्रतिमा खराब करण्यास मुस्लिम देशच जबाबदार असल्याचेही ते म्हणाले .OIC: In OIC meeting, Pakistan’s Prime Minister Imran Khan said that Muslim countries are responsible for Islamophobia in the world!

OIC च्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना इम्रान खान म्हणाले की 9/11 च्या हल्ल्यानंतर इस्लामोफोबिया वाढला आहे, ज्याला थांबवण्यासाठी मुस्लिम देशांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. इस्लामोफोबियाचा सामना करण्यासाठी बरेच काही करायचे बाकी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

‘मी विशेषत: ओआयसीच्या सदस्यांचे आभार मानू इच्छितो कारण संयुक्त राष्ट्रात ऐतिहासिक ठराव मंजूर करण्यात आला आहे. 15 मार्च हा इस्लामोफोबियाशी लढा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे.

न्यूझीलंडमधील क्राइस्टचर्च घटनेचा संदर्भ देत इम्रान खान म्हणाले, ’15 मार्च रोजीच न्यूझीलंडमधील एका मशिदीत घुसून 50 जणांची हत्या केली. त्याने मशिदीत लोकांना का मारले? कारण त्याला सर्व मुस्लिम दहशतवादी वाटत होते. हा इस्लामोफोबिया कुठून आला आणि कोणी वाढू दिला? हे सर्व 9/11 च्या घटनेनंतर घडले आणि ते थांबवण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही.

इम्रान खान यांनी पुढे प्रश्न केला की, ‘इस्लामची दहशतवादाशी तुलना का करण्यात आली? मला माफ करा पण मुस्लिम देशांनी हा गैरसमज तोडण्यासाठी काहीही केले नाही म्हणून असे घडले. कोणत्याही धर्माचा कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाशी संबंध कसा जोडता येईल?’

इम्रान खान म्हणाले की, इस्लाम आणि दहशतवादाची धारणा मोडून काढण्याऐवजी काही मुस्लिम राष्ट्रप्रमुख उदारमतवादी मुस्लिम असल्याचे सांगू लागले. ते पुढे म्हणाले, ‘जेव्हा तुम्ही उदारमतवादी मुस्लिम आहात असे म्हणता, तेव्हा इस्लाममध्येही काही अतिरेकी आहेत हे न सांगता स्पष्ट होते .

इम्रान खान यांनी प्रबुद्ध उदारमतवादी इस्लाम या शब्दाच्या वापरावर आक्षेप घेत म्हटले की, ‘प्रबुद्ध उदारमतवादी इस्लाम ही संज्ञा इस्लामला दहशतवादाशी जोडणाऱ्यांना खूश करण्यासाठी वापरली जाते. परिणामी, असा समज निर्माण झाला आहे की इस्लामची अनेक रूपे आहेत – कट्टरपंथी इस्लाम आहे, उदारमतवादी इस्लाम आहे… परंतु इस्लाम फक्त एक आहे… प्रेषित मोहम्मद यांचा इस्लाम.’ते म्हणाले की इस्लामला बदनाम केले जात आहे, तरीही मुस्लिम देशांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली नाही.

OIC: In OIC meeting, Pakistan’s Prime Minister Imran Khan said that Muslim countries are responsible for Islamophobia in the world!

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात