ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावला तर रस्त्यावर उतरू, देवेंद्र फडणवीस यांचा इशारा


ओबीसी आरक्षणात वाटेकरी स्वीकारणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावाल तर याद राखा, रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : ओबीसी आरक्षणात वाटेकरी स्वीकारणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावाल तर याद राखा, रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

OBC reservation Devendra Fadnavis warns

भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या बैठकीत फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देताना त्यात ओबीसींच्या आरक्षणाला धक्का दिला जाणार नाही, याबाबतचे कलम आम्ही टाकले. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. पण या कलमाला कोणतीही स्थगिती दिली नाही. या कलमाद्वारे आम्ही ओबीसी आरक्षणाला संरक्षण दिले आहे.



उद्धव ठाकरे-अजित पवार सरकारच्या डोक्यात सत्ता गेली असून राज्यात अघोषित आणीबाणी आहे. महाराष्ट्राची सामाजिक घडी विसकटत आहे असा आरोप करून फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारच्या भूमिकेमुळे मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिला आहे. या विषयाबाबत सरकार गंभीर नाही. सरकारचे मंत्री आणि प्रतिनिधी ओबीसी आरक्षणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. मंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये जाऊन स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. ओबीसी समाजाच्या मनात भयाचे वातावरण असून सरकारची बोटचेपी भूमिका आहे.

OBC reservation Devendra Fadnavis warns

राज्य सरकारच्या कामगिरीवर हल्लाबोल चढविताना फडणवीस म्हणाले, सरकारी अहवालात मेट्रो कांजुरमार्गला नेल्यास नुकसान होईल अशी नोंद असूनही अहवाल डावलून कारशेड कांजूरला करण्यात येत आहे. राजकीय हेतुने मुंबई मेट्रो 4 वर्षाने पुढे जाणार आहे. विद्युत बिलाबाबत सरकारनं घुमजाव केलं आहे. कोरोनाच्या काळात मोठा भ्रष्टाचार झाला हे मन विषण्ण करणारं आणि संताप आणणारं आहे. सरकार कशाबद्दल स्वत:ची पाठ थोपटून घेतंय हे अनाकलनीय आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात