विशेष प्रतिनिधी
कोलकाता:तृणमूलच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँने 26 ऑगस्ट 2021 रोजी एका मुलाला जन्म दिला. अभिनेत्रीने आपल्या मुलाचे नाव Yishan ठेवले. जन्मानंतर ईशानचे वडील कोण आहेत याविषयी चर्चा सुरू होती. कारण नुसरत जहाँने गरोदरपणापूर्वीच पती निखिल जैनपासून वेगळे राहणे सुरू केले होते आणि निखिल जैनने असेही म्हटले होते की, त्याला नुसरतच्या गर्भधारणेविषयी कोणतीही माहिती नाही. नंतर, जेव्हा नुसरत निखिल जैनपासून विभक्त झाली आणि नुसरतने एका मुलाला जन्म दिला, तेव्हा वडिलांच्या नावाचे गुढ वाढले.यावर नुसरतने मात्र अद्यापही मौनच बाळगले आहे .यावर नुसरतने मात्र अद्यापही मौनच बाळगले आहे .Nusrat Jahan Controversy: BJP’s yash Dasgupta is the father of Trinamool Congress’ Nusrat Jahan’s son! ‘Birth registration’ finally reveals secrets …
The Birth certificate of @nusratchirps child Ishaan as per KMC records declares Yash Dasgupta as the father of Ishaan pic.twitter.com/yz3vRWBAc1
— Payal Mehta/પાયલ મેહતા/ पायल मेहता/ পাযেল মেহতা (@payalmehta100) September 16, 2021
असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत होते ज्यात नुसरत जहाँला तिच्या मुलाच्या वडिलांबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता, पण प्रत्येक वेळी नुसरत गोल गोल उत्तरे देऊन निघून गेली. पण या दरम्यान नुसरत जहाँच्या मुलाचे वडील भाजपचे यश दासगुप्ताच असल्याची खात्री झाली आहे.
वास्तविक, नुसरतच्या मुलाच्या जन्म नोंदणीचे प्रमाणपत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात मुलाचे पूर्ण नाव ईशान जे दासगुप्ता असे लिहिले आहे. हे प्रमाणपत्र समोर आल्यानंतर अनेक माध्यमांच्या वेबसाइटने यश दासगुप्ताच ईशानचे वडील असल्याचे सांगितले आहे.
कोलकाता महानगरपालिकेत दाखल केलेल्या कागदपत्रानुसार नुसरतच्या मुलाच्या वडिलांचे नाव देबाशीस दासगुप्ता असे आहे. हे नाव अभिनेता यश दासगुप्ताचे अधिकृत नाव आहे. या दस्तऐवजावरून हे स्पष्ट झाले आहे की नुसरत जहाँच्या मुलाचे वडील यश दासगुप्ताच आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App