Mayawati – Pawar President : लिलीपूटांच्या महत्त्वाकांक्षी पुड्या… अर्थात मराठी – हिंदी माध्यमांचे “पॅकेजी” चुलत नाते…!!


“उत्तर प्रदेशात लिलीपूटांच्या महत्त्वाकांक्षा उफाळल्या”… “मराठी माध्यमांची चुलत भावंडे उत्तर प्रदेशात”… “येऊ नको म्हटले तर कोणत्या गाडीत बसू?… “अगं म्हशी मला कुठे नेशी”… हे सगळे वाक्प्रचार आठवण्याचे किंवा लिहिण्याचे कारण म्हणजे… बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी स्वतःच्या राजकीय भवितव्याचा लावलेला “राजकीय जावईशोध” होय…!!Nobody really offered the President’s post to Mayawati and Sharad Pawar as both of them are powerless politicians

मायावतींना म्हणे, राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली गेली. ही ऑफर किंबहुना अफवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीने देशाच्या राजकीय वातावरणात सोडून दिली… राष्ट्रपतीपदाची कोणतीही ऑफर आपण स्वीकारणार नसल्याचे मायावती यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले… “लिलीपूटी महत्त्वाकांक्षा” म्हणतात ती हीच…!!403 आमदारांच्या उत्तर प्रदेश विधानसभेत ज्या मायावतींच्या पक्षाचा फक्त एक आमदार निवडून आला आहे, त्यांना म्हणे कोणी राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली…!! खुद्द मायावतींनी ही अफवा असून ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आणि भारतीय जनता पार्टीने सोडल्याचा दावा केला आहे.

आता ज्या मायावतींची राजकीय तब्येत गेल्या तीन निवडणुकांमध्ये खालावत जाऊन एकमेव आमदारा पर्यंत येऊन ठेपली आहे, त्या मायावतींना उत्तर प्रदेशात सलग दुसऱ्यांदा बहुमताने निवडून आलेल्या भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली आहे, हे म्हणण्यासारखा दूसरा राजकीय बेअक्कलपणा देशात घडलेला नाही…!!

पण मायावतींना ही ऑफर दिल्याच्या बातम्या हिंदी प्रसार माध्यमांनी जोरदार चालवून घेतल्या. या बाबतीत हिंदी प्रसार माध्यमे सध्याच्या मराठी प्रसार माध्यमांची चुलत भावंडे शोभतात खरी…!!

 पवारांच्या राष्ट्रपतीपदाच्या पुड्या!!

राष्ट्रपतीपदाच्या ऑफरच्या बातम्या मराठी प्रसार माध्यमांनी गेल्या दोन निवडणुकांमध्ये चालवून घेतल्या आहेत. फक्त फरक हा आहे की हिंदी प्रसार माध्यमांनी मायावतींच्या राष्ट्रपतीपदाच्या बातम्या चालवल्या आणि मराठी प्रसार माध्यमांनी शरद पवारांच्या राष्ट्रपतीपदाच्या बातम्या चालवून घेतल्या आहेत…!!

राष्ट्रपतीपदाची निवडणूक आली की शरद पवारांच्या राष्ट्रपतीपदाची पुडी सोडण्यात येते, हा गेल्या दोन निवडणूकातला अनुभव आहे. जणू काही भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांकडे राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांचा दुष्काळच आहे… त्यासाठी मग मराठी प्रसार माध्यमांमध्ये गेल्या दोन राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या कालावधीत शरद पवारांचा राष्ट्रपतीपदाच्या पुड्या सोडण्यात आल्या. यामध्ये स्वतःला “लोकमान्य लोकशक्ती” म्हणवणारे पेपर त्याचबरोबर “उघडा डोळे बघा नीट” म्हणणारे न्यूज चॅनेल आघाडीवर होते…!! जणू काही देशातली सगळी राजकीय समज – अक्कल आपल्यालाच आहे, असा या दोन प्रसार दोन मराठी प्रसार माध्यमांचा समज आहे आणि शरद पवारांची राजकीय उंची बाकी कोणत्याही राजकीय पक्षांपेक्षा “अफाट” आहे असा त्यांचा दावा आहे…!!

पवारांचे लिलीपूटी राजकीय कर्तृत्व!!

आता शरद पवारांची राजकीय उंची 50 – 60 आमदारांना पर्यंत जाऊन पोहोचते आणि सिंगल डिजिट खासदारांच्या आतच उडी पडते हे या मराठी स्वनामधन्य प्रसारमाध्यमांना सांगणार कोण…?? पण त्यांना “पॅकेजी” पत्रकारिता चालवायची आहे ना…!!

त्यामुळे मग राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका आल्या की ते शरद पवारांच्या राष्ट्रपतीपदाच्या पुड्या सोडत बसतात. त्यात मोदींचे गुरुत्व ही चिकटवण्यात येते.

मायावतींचे कर्तृत्व पवारांपेक्षा मोठे… पण…

नेमके असेच आता उत्तर प्रदेशातल्या हिंदी प्रसार माध्यमांनी मायावतींच्या बाबतीत करून घेतले आहे. मायावतींची देखील राजकीय उंची शरद पवारांनी पेक्षा फार वेगळी नाही किंवा फार मोठी देखील नाही. उत्तर प्रदेशात त्या एकेकाळी पूर्ण बहुमताने सत्तेवर आल्या होत्या हे खरे. या बाबतीत या शरद पवारांपेक्षा राजकीय कर्तृत्ववान आहेत हे देखील खरे…!! पण म्हणून लगेच लोकसभेत, राज्यसभेत आणि उत्तर प्रदेशासारख्या सर्वात मोठ्या राज्यात बहुमतात असलेला भारतीय जनता पक्ष मायावती यांना राष्ट्रपतीपदाची ऑफर देईल असे म्हणणे म्हणजे स्वतःची राजकीय समज आणि अक्कल अस्थानी पाजळण्या सारखेच आहे…!! आत्तापर्यंत मोदींचे राजकारण ज्या “सरळ वळणाने” गेले आहे, ते पाहता मोदी राष्ट्रपती पदासाठी “सरप्राईज कॅंडिडेट” निवडतात, हे दिसून येते. आता ना मायावती “सरप्राईज कॅंडिडेट” आहेत… ना शरद पवार…!!

पॅकेजी पत्रकारितेची भुरळ

पण जशी मराठी माध्यमे “पॅकेजी पत्रकारिता” करताना शरद पवारांची उंची त्यांच्या मूलभूत राजकीय कर्तृत्वापेक्षा कितीतरी वाढवून ठेवतात… तसेच मायावतींच्या बाबतीत हिंदी प्रसार माध्यमांनी केलेले दिसते. हिंदी प्रसार माध्यमे बहुतेक आपले चुलत भावंड मराठी प्रसार माध्यमांच्या “पॅकेजी पत्रकारितेला” भुललेलि दिसतात…!! यातूनच त्यांनी मायावतींच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीची पुडी सोडलेली दिसते… पण पुडी ती पुडीच…!! तिचे राजकीय वस्तुस्थितीत कसे रूपांतर होणार…??

प्रसारमाध्यमांची लिलीपूटी बुद्धिमत्ता!!

जेव्हा भाजपला 4 मोठ्या राज्यांमध्ये विजय मिळाला आहे, लोकसभेत आणि राज्यसभेत आता पूर्ण बहुमत आहे, त्यावेळी इतर कोणत्या पक्षाचा नेता राष्ट्रपतीपदी विराजमान होईल ही शक्यताच फार कमी आहे. अशात ज्यांचे राजकीय कर्तृत्व मुळात “लिलीपूटी” आहे, त्या मायावती आणि शरद पवार यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी पुढे आणणे ही आपली बौद्धिक पातळी लिलीपूटा सारखी आहे हेच दाखवून देण्यासारखे आहे. हे राष्ट्रपतीपदाच्या गेल्या दोन निवडणुकीत मराठी प्रसार माध्यमांनी दाखवून दिले आहे. यंदाच्या निवडणुकीत हिंदी प्रसार माध्यमे दाखवत आहेत…!! हिंदी आणि मराठी प्रसारमाध्यमे एकमेकांचे चुलत भावंडे शोभतात खरी…!!

Nobody really offered the President’s post to Mayawati and Sharad Pawar as both of them are powerless politicians

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था