राज्यातील वीज ग्राहक भरमसाठ वीज बिलांमुळे संतप्त आहे. लॉकडाऊनच्या काळात आलेल्या या वीजबिलांमध्ये ग्राहकांना न्याय द्यावा अशी मागणी ग्राहक करत होते. मात्र, महावितरणने ही मागणी अमान्य करत हप्ते बांधून दिले आहेत.
विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्यातील वीज ग्राहक भरमसाठ वीज बिलांमुळे संतप्त आहे. लॉकडाऊनच्या काळात आलेल्या या वीजबिलांमध्ये ग्राहकांना न्याय द्यावा अशी मागणी ग्राहक करत होते. मात्र, महावितरणने ही मागणी अमान्य करत हप्ते बांधून दिले आहेत.
चीनी व्हायरसच्या काळात राज्यातील वीज ग्राहकांना भरमसाठ वीज बिल आले होते. विरोधी पक्षांनी यावरून आंदोलनेही केली होती. मात्र, त्याची दखल न घेता आता महावितरणने हप्ते बांधून देण्याचा पर्याय दिला आहे.
थकीत वीजदेयक हप्त्यांनी भरण्यासाठी महावितरणकडून नवी योजना जाहीर करण्यात आली आहे. कृषी ग्राहक वगळून इतर सर्व उच्च आणि लघुदाब ग्राहकांना केवळ दोन टक्के रक्कम भरून या योजनेत सहभागी होता येणार आहे. थकबाकीमुळे वीजजोड तोडलेल्या त्याचप्रमाणे वीजचोरी किंवा न्यायप्रविष्ट प्रकरणातील वीज ग्राहकांनाही काही अटींवर योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आठ महिन्यांच्या कालावधीत राज्यात ९८ लाखांहून अधिक ग्राहकांनी एकदाही वीज देयक भरले नाही. त्यामुळे महावितरणची थकबाकी ५८ हजार कोटींच्याही पुढे गेला आहे. त्यात लघु आणि उच्चदाब ग्राहकांकडे १५ हजार १२१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या ग्राहकांसाठी ही नवी योजना जाहीर करण्यात आली आहे.
कृषी ग्राहक वगळता इतर वर्गवारीतील ग्राहकांना चालू वीजदेयकाची रक्कम भरण्यासाठी तीन हप्त्यांची सोय उपलब्ध आहे. त्यात डाउन पेमेंटटी आवश्यकता नाही. सध्या वीजपुरवठा सुरू असलेले थकबाकीदार आणि वीजपुरवठा तोडलेल्या ग्राहकांनी ३० टक्के डाउन पेमेंट केल्यास या योजनेत त्यांना अधिकाधिक १२ सुलभ हप्त्यांची सोय उपलब्ध आहे. सोबतच खंडित वीज सुरू करता येईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App