आपण स्वत: शेती करतो. बाजार समितीत न जाता भाजीपाला विकतो. त्यामुळे मी शेतकरी म्हणून सांगून इच्छितो की नवा कृषि कायदा शेतकरी हिताचाच आहे, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आपण स्वत: शेती करतो. बाजार समितीत न जाता भाजीपाला विकतो. त्यामुळे मी शेतकरी म्हणून सांगून इच्छितो की नवा कृषि कायदा शेतकरी हिताचाच आहे, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
nitin gadkari farmer protest news
गडकरी म्हणाले की, शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच हे कायदे आहेत. नागपुरात मी सेंद्रीय शेती करतो, माझी पत्नी ते सगळं काम पाहते. नागपूर येथील प्रताप नगर येथे तो भाजीपाला विकला जातो तिथे शेतीतल्या उत्पादनांना चांगला भाव मिळतो. मला बाजार समितीत जाण्याची गरज नाही. जर कायदा झाला नसता तर हे घडलं असतं का? तीनपैकी एकही कायदा शेतकऱ्यांच्या विरोधात नाही.
महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी या विधेयकाचे समर्थन केले आहे. काही लोक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकसभेत आणि राज्यसभेत बिल आणलं गेलं तेव्हा सगळ्या पक्षांनी त्या चर्चेत सहभाग घेतला होता. आपल्या सूचनाही दिल्या होत्या. त्या सगळ्या सूचना सरकारने लक्षात घेतल्या. त्यामुळे आमच्याशी चर्चा झालीच नाही हे विरोधकांचं म्हणणं गैर आहे, असे सांगून गडकरी म्हणाले, राजकारण जरुर केले जावे त्यात काही वाद नाही. मात्र शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे त्यामध्ये राजकारण कुणीही आणू नये.
हे कायदे शेतकऱ्यांच्या बाजूचे आहेत. शेतकरी हिताचेच हे कायदे आहेत. शेतकऱ्याला शेतमाल कुठे विकायचा आहे? थेट विकायचा आहे की बाजार समितीत जाऊन विकायचा आहे हा निर्णय सर्वस्वी त्याचा असणार आहे, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. ते गडकरी म्हणाले की, आज विदर्भातली परिस्थिती अशी आहे की शेतकरी आत्महत्या करत आहेत. महाराष्ट्रातले शेतकरी आत्महत्या करत आहेत. कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे. सरकार त्यांच्याशी चर्चा करतं आहे. आजही चर्चा करायला तयार आहे काही सुधारणा सुचवायच्या असतील तर त्या शेतकऱ्यांनी नक्की सुचवाव्यात त्यांचाही विचार मोदी सरकार करणार यात काहीही शंका नाही. मात्र निव्वळ शेतकऱ्यांना पुढे करुन जे राजकारण केलं जातं आहे ते गैर आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App