वृद्ध रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होम क्वारंटाईनची परवानगी दिली जाईल.New guidelines issued by the Center on Home Quarantines
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अनेक नियमांत बदल केले आहेत.दरम्यान सगळ्यात महत्वाचा बदल होम क्वारंटाईनच्या गाईडलाईन्समध्ये करण्यात आला आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सौम्य लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांसाठीच्या होम क्वारंटाईन्सबाबत या नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.
Union Health Ministry issues revised guidelines for home isolation of mild/asymptomatic COVID-19 patients pic.twitter.com/5OyCGGM2qh — ANI (@ANI) January 5, 2022
Union Health Ministry issues revised guidelines for home isolation of mild/asymptomatic COVID-19 patients pic.twitter.com/5OyCGGM2qh
— ANI (@ANI) January 5, 2022
१) होम क्वारंटाईन असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना किमान सात दिवस क्वारंटाईन व्हावे लागेल.
२) गेल्या तीन दिवसांपासून ताप आलाच नसेल अशा रुग्णांचा होम क्वारंटाईनचा कालावधी संपेल.
३) वृद्ध रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होम क्वारंटाईनची परवानगी दिली जाईल.
४) सौम्य लक्षणे असलेले रुग्ण घरीच उपचार घेतील, मात्र यासाठी घरात प्रॉपर वेंटिलेशन असणे गरजेचे आहे.
५) रुग्णांना ट्रीपल लेअर मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
६) रुग्णांना आहारात जास्तीत जास्त द्रव पदार्थ खाण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
७) ज्या रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी 93% पेक्षा जास्त आहे त्यांना होम क्वारंटाईन राहण्याची परवानगी असेल.
८) रुग्णाला डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्टेरॉइड्स, सीटी स्कॅन आणि छातीचा एक्स-रे करण्यास मनाई आहे.
९) सौम्य आणि लक्षणे नसलेले रुग्ण जे होम आयसोलेशनमध्ये असतील त्यांना जिल्हा स्तरावरील नियंत्रण कक्षाच्या सतत संपर्कात रहावे लागेल.
१०) सतत नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहिल्यावर त्यांची चाचणी करण्यास आणि गरज भासल्यास त्यांना रुग्णालयात बेड वेळेवर मिळण्यास मदत होईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App