दिवंगत पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावरील नवे पुस्तक, त्यांच्या 96 व्या जयंतीदिनी येत्या 25 डिसेंबर रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे. वाजपेयींचे विचार आणि त्यांची कार्यशैली याबाबतची माहिती या पुस्तकातून मिळणार आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिवंगत पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावरील नवे पुस्तक, त्यांच्या 96 व्या जयंतीदिनी येत्या 25 डिसेंबर रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे. वाजपेयींचे विचार आणि त्यांची कार्यशैली याबाबतची माहिती या पुस्तकातून मिळणार आहे.
New book on the life of Atal Bihari Vajpayee
वाजपेयी : द इयर्स दॅट चेंज्ड् इंडिया असे या पुस्तकाचे नाव आहे. लेखक शक्ती सिन्हा यांनी हे पुस्तक लिहिले असून, ते 1990 च्या दशकात सुमारे चार वर्षे वाजपेयींच्या अतिशय जवळ होते. 1996 ते 97 या काळात वाजपेपी लोकसभेत विरोधी पक्षनेते असताना, सिन्हा त्यांचे सचिव होते आणि त्यानंतर 1998 ते 99 या काळात त्यांचे स्वीय सचिव होते.
1998 मध्ये केंद्रात भाजपाच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकार स्थापन करताना आणि सुमारे 24 राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन ते चालविताना वाजपेयी यांना किती आणि कशा प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला होता, याची माहिती कुणालाच नाही.
या सर्व अडचणी असतानाही वाजपेयी यांनी पोखरण येथे अणुचाचण्या करण्याचा निर्णय घेतला. इतकेच नव्हे, तर भारत आणि पाकिस्तानमधील शत्रुत्व कायमचे संपुष्टात आणण्यासाठी त्यांनी दिल्ली-लाहोर बसने प्रवास करून, पाकिस्तानकडे मैत्रीचा हातही पुढे केला होता. कारगिलमध्ये पाकिस्तानने युद्ध छेडले असता, त्यांनी भारतीय सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी धाडसी निर्णय घेतले, या सर्व घडामोडींची माहिती या पुस्तकातून मिळणार असल्याचे सिन्हा यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App