नेहरूंनी आणि नरसिंह रावांनी काश्मीरमध्ये सार्वमताचे (plebiscite) आश्वासन दिले होते, ते पाळले नाही; फारूख अब्दुल्लांचा गंभीर आरोप

वृत्तसंस्था

श्रीनगर – भारताच्या पहिल्या पंतप्रधानांनी आणि नंतरच्या एका पंतप्रधानांनी काश्मीरी जनतेला सार्वमताचे (plebiscite) आश्वासन दिले होते. पण कालांतराने ते मागे हटले, असा गंभीर आरोप जम्मू – काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूख अब्दुल्ला यांनी केला आहे. Nehru and Narasimha rao assured plebisite in jammu and kashmir, but later they backtracked, claims dr. Farooq Abdullah

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू – काश्मीरसंदर्भात घेतलेल्या बैठकीनंतर दोन दिवसांनी श्रीनगरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत फारूख अब्दुल्ला यांनी हा आरोप केला. ते म्हणाले, की भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी जम्मू – काश्मीरमध्ये सार्वमत (plebiscite) घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, ते नंतर मागे हटले. त्यानंतर देखील नरसिंह राव यांनी पंतप्रधान असताना काश्मीरमध्ये तेच सार्वमत (plebiscite) घेण्याचे आश्वासन दिले होते. ते तर sky is the limit, पण स्वातंत्र्य (independence) नाही, असे म्हणाले होते. आम्ही देखील त्यांना आम्हाला स्वातंत्र्य (independence) नको पण स्वायत्तता हवी असेच सांगितले होते. पण ते देखील नंतर मागे हटले, असा दावा फारूख अब्दुल्ला यांनी केला. काश्मीरी जनतेचा हा विश्वासघात झाला आहे. हा विश्वास पुन्हा निर्माण करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

तर भाजपला त्यांच्या अजेंड्यानुसार ३७० कलम हटवायला ७० वर्षे लागली. आम्हाला ते पुनःस्थापित करायला ७० आठवडे, ७० महिने किंवा त्यापेक्षाही जास्त काळ लागला तरी चालेल. आम्ही आमच्या मार्गापासून ढळणार नाही, अशी गर्जना ओमर अब्दुल्ला यांनी केली. त्याला फारूख अब्दुल्ला यांनी दुजोरा दिला.

Nehru and Narasimha rao assured plebisite in jammu and kashmir, but later they backtracked, claims dr. Farooq Abdullah

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात