आमच्या गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी चळवळीला समर्थन करणाऱ्या एका व्यक्तीची चौकशी करण्यात आली होती. न्यायालायनेही त्याला जामीन दिला नव्हता. त्याचा फोटो शेतकरी आंदोलनातून कसा काय समोर आला? शेती आणि शेतकऱ्यांसी नक्षलवाद्यांचा काय संबंध, असा सवाल केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आमच्या गडचिरोली जिल्ह्यात एका नक्षलवादी चळवळीला समर्थन करणाऱ्या एका व्यक्तीची चौकशी करण्यात आली होती. न्यायालायने त्याला जामीनही दिला नव्हता. त्याचा शेतकरी आंदोलनातील फोटो कसा काय समोर आला? शेती आणि शेतकऱ्यांशी काय संबंध असा सवाल केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गडकरी बोलत होते. ते म्हणाले की, मी सर्व शेतकरी किंवा शेतकरी संघटनांबाबत बोलत नाहीये. पण काही घटक शेतकरी आंदोनलनाचा फायदा घेत त्यांची बदनामी करत आपला अजेंडा पुढे नेत आहेत.
भारतविरोधी भाषण देणारी एखादी व्यक्ती, ज्याचा शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे काहीच संबंध नाही त्यांचे फोटो कसे काय समोर येत आहेत? यामुळेच काही घटक शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून बदनामी करत अजेंडा पुढे नेत असल्याचं मी म्हटलं. हा शेतकरी किंवा शेतकरी संघटनांचा अजेंडा नाही. शेतकऱ्यांनी यापासून लांबच राहिलं पाहिजे.
गडकरी म्हणाले की, आमचं सरकार शेतकऱ्यांना कृषी कायदे योग्य आहेत हे पटवून देईल, समजावून सांगेल. चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढला जाईल. सध्याच्या घडीला कृषी आणि वाणिज्य मंत्री शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यात व्यस्त आहेत. जर मला चर्चा करण्यासाठी सांगितलं तर मी नक्कीच त्यांच्याशी संवाद साधेन.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App