
गळ्यात भगवा उपरणं, स्वाभिमानी चेहरा ईडीच्या कार्यालयात जाताना संजय राऊत यांची बॉडी लँग्वेज कशी “करारी” होती याची बहारदार वर्णने मराठी माध्यमांनी केली आहेत. ईडीच्या कार्यालयाच्या दरवाजात उभे राहून हात हलवून माध्यमांना प्रतिक्रिया देणे, ईडीच्या कार्यालयाच्या गच्चीत जाऊन आपली छबी माध्यमांना टिपू देणे वगैरे बॉडी लँग्वेज संजय राऊत यांनी 31 जुलै 2022 रोजी सादर केली आहे. खोट्या खटल्यामध्ये ईडी मला अटक करणार आहे आणि मी अटक करून घ्यायला चाललो आहे. संजय राऊत आणि शिवसेना झुकणार नाही, असे संजय राऊत यांचे ईडी कार्यालयात पोहोचण्यापूर्वी शेवटचे वाक्य होते. मराठी माध्यमांनी याचे रिपोर्टिंग वर उल्लेख केल्याप्रमाणे बहारदार पद्धतीने केले आहे.Nawab Malik Sanjay Raut Contrac similarity of body language in ED door But what about the body reaction after the arrest??
ईडीच्या पायऱ्यांवरील बॉडी लँग्वेज
पण ईडीच्या कार्यालयाच्या पायऱ्यांवर उभे राहून हा उंचावणे हात हलवणे अशी बॉडी लँग्वेज काही महिन्यांपूर्वीच नवाब मलिक यांनी दाखवली होती. ती बॉडी लँग्वेज सुद्धा अशीच स्वाभिमानी आणि करारी होती!! फक्त त्यावेळी त्यांच्या गळ्यात भगवे उपरणे नव्हते. अर्थातच तसे उपरणे असण्याची शक्यताही नव्हती कारण नवाब मलिक हे काही संजय राऊत यांच्यासारखे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते नव्हेत. ते राष्ट्रवादीचे नेते आहेत. पण नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्या ईडीच्या कार्यालयाच्या दरवाज्यातील बॉडी लँग्वेज मध्ये विलक्षण “करारी” साम्य दिसले आहे!!… आता प्रश्न फक्त हा आहे, की ईडीने अटक केल्यानंतर संजय राऊत यांची बॉडी लँग्वेज कशी राहते?? त्यांची बॉडी कशी रिऍक्ट करते??
मलिकांची शारीरिक दुखणी उफाळली
कारण नवाब मलिक यांचा अटकेनंतरचा अनुभव काही वेगळे आणि विपरीत सांगून गेला आहे. नवाब मलिक त्यांना ईडीने अटक केल्यानंतर दोनच दिवसांनी त्यांची सगळी शारीरिक दुखणी उफाळून आली. डायबिटीस पाठदुखी आणि किडनीचे विकार उफाळल्यामुळे त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यांनी तेथून आपल्या सुटकेसाठी कोर्टामध्ये धाव घेतली. त्यानंतर हायकोर्टात धाव घेतली. आपल्या विविध आजारांची कारणे नवाब मलिक यांनी स्वतःच्या सुटकेसाठी कोर्टाला सादर केली पण अद्याप नवाब मलिक यांची ईडीच्या कोठडीतून आणि न्यायालयीन कोठडीतून सुटका झालेली नाही.
मग आता संजय राऊत यांची बॉडी लँग्वेज देखील अटकेच्या दिवशी नवाब मलिक यांच्या अटकेच्या दिवसा सारखीच आहे. पण प्रत्यक्ष अटकेनंतर आणि ईडीच्या कोठडी ठेवल्यानंतर यानंतर संजय राऊत यांची बॉडी लँग्वेज कशी असेल?? या विषयी महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला प्रचंड उत्सुकता आहे.
संजय राऊत यांचे काय??
संजय राऊत यांना नवाब मलिक यांच्यासारखे कोणतेही शारीरिक विकार नसल्याचे तरी सांगण्यात येते. पण शेवटी मनुष्य शरीर आहे. केव्हा कोणती दुखणी उद्भवतील??, हे सांगता येत नाही. त्यामुळे ईडीच्या कोठडीत राहून संजय राऊत यांची कोणती दुखणी केव्हा उफाळून येतील??, हे कोणी सांगू शकत नाही. त्यावेळी संजय राऊत यांची बॉडी लँग्वेज कशी असेल?? किंबहुना त्यांची बॉडी कशी रिऍक्ट करेल?? संजय राऊत यांना ईडीचे अधिकारी कोर्टात केव्हा सादर करणार आहेत?? त्यावेळी त्यांच्यावरचे आरोप कागदोपत्री कसे दाखल करणार आहेत?? त्यांना संजय राऊत कशी उत्तरे देणार आहेत??, याची देखील उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे.
मराठी माध्यमांचे रिपोर्टिंग कसे??
बाकी नवाब मलिक यांची अटके पूर्वीची बॉडी लँग्वेज आणि तिचे रिपोर्टिंग तसेच संजय राऊत यांची ईडीच्या अटके पूर्वेची बॉडी लँग्वेज आणि तिचे रिपोर्टिंग यातले विलक्षण साम्य अनेकांना भावून गेले आहे… प्रश्न फक्त नंतरच्या बॉडी लँग्वेजचा आणि बॉडी रिएक्शनचा आहे… आणि मराठी माध्यमांमधील त्याच्या रिपोर्टिंगचाही!!
Nawab Malik Sanjay Raut Contrac similarity of body language in ED door But what about the body reaction after the arrest??
महत्वाच्या बातम्या
- पत्राचाळ घोटाळा : 9 तासांच्या चौकशीनंतर अखेर संजय राऊत ईडीच्या ताब्यात!!
- इस्लामी ISIS कनेक्शन : NIA ची देशभरात 6 राज्यांमध्ये धडक कारवाई; कोल्हापूर, नांदेडमध्येही छापे!!
- ईडी कारवाईच्या भीतीने आमच्याकडे येऊ नका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे जाहीर आवाहन
- बाळासाहेब ठाकरेंची शपथ कशाला?, शरद पवारांची शपथ घ्या!!; रामदास कदमांचा संजय राऊतांना टोला