धोरणांमध्ये, राजकारणामध्ये फरक, मात्र सर्वजण जनतेच्या सेवेसाठी विसरता कामा नये; पंतप्रधानांचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्लीमध्ये नवीन संसद भवनाचे भूमिपूजन झाले. या वेळी बोलताना मोदी म्हणाले, आपल्या धोरणांमध्ये अंतर असून शकेल. आपल्या राजकारणही वेगवेगळ्या पद्धतीचं असू शकतं. मात्र आपण सर्वजण इथे जनतेच्या सेवेसाठी आहोत.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आपल्या धोरणांमध्ये आणि राजकारणामध्ये फरक असू शकतो मात्र आपण सर्वजण इथे जनतेच्या सेवेसाठी आहोत हे विसरता कामा नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. Narendra Modi new Parliament House news

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्लीमध्ये नवीन संसद भवनाचे भूमिपूजन झाले. या वेळी बोलताना मोदी म्हणाले, आपल्या धोरणांमध्ये अंतर असून शकेल. आपल्या राजकारणही वेगवेगळ्या पद्धतीचं असू शकतं. मात्र आपण सर्वजण इथे जनतेच्या सेवेसाठी आहोत. हेच आपलं अंतिम ध्येय असायला हवं आणि यामध्ये कोणताही मतभेद असताना कामा नये. वाद-संवाद संसदेमध्ये असो किंवा संसदेच्या बाहेर असो आपण सर्वांनी राष्ट्रसेवेचे संकल्प घाती घेतला असून राष्ट्राच्या हितासाठी आपण करत असलेले समर्पण आपल्या प्रत्येक कृतीमधून झळकलं पाहिजे.

नवीन संसद भवनाचे महत्व सांगताना पंतप्रधान म्हणाले, नवीन संसदेमध्ये अशा अनेक गोष्टी असतील ज्यामुळे खासदारांची दक्षता वाढले आणि काम करण्याच्या त्यांच्या शैलीमध्ये आधुनिकता येईल. सध्याच्या संसद भवनाने आपल्याला स्वातंत्र्यानंतर दिशा दाखवण्याचं काम केलं. तर नवीन संसद भवन हे आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीचं साक्षीदार ठरेल. जुन्या संसद भवनामध्ये देशासाठी आवश्यक असणाºया मूलभूत गोष्टींसाठी काम करण्यात आलं तर नवीन संसदेमध्ये आता एकविसाव्या शतकातील भारताच्या महत्वकांशा पूर्ण करण्यासंदभार्तील काम होईल.

Narendra Modi new Parliament House news

मोदी म्हणाले, १३ व्या शतकामध्ये मॅग्नाकार्टा यांच्याआधी १२ व्या शतकामध्ये भगवान बसवेश्वर यांनी लोकसंसदेची सुरुवात केली होती. दहाव्या शकतामध्ये तामिळनाडूमधील एका गावामध्ये पंचायत व्यवस्था अस्तित्वात होती असे संदर्भ सापडतात. या गावामध्ये आजही तशाच प्रकारची महासभा आयोजित केली जाते. एक हजार वर्षांपासून ही परंपरा तिथे सुरु आहे. त्यावेळी सुद्धा कोणत्याही प्रतिनिधीने आपल्या संपत्तीची माहिती देण्यास नकार दिला तर तिला आणि तिच्या नातेवाईकांना निवडणूक लढू दिली जात नव्हती.

आपल्या सर्वांना लोकप्रतिनिधी म्हणून हे लक्षात ठेवायला हवं की लोकशाही ही संसद भवनाचा मूळ आधार असून तिच्याबद्दलचा आशावाद आपण कायम ठेवला पाहिजे. हे आपल्या सर्वांच कर्तव्य आहे. संसदेमध्ये पोहचणारा प्रत्येक प्रतिनिधी हा जनतेला उत्तर देण्यास बांधील असतो हे कधीही विसरता कामा नये. ही बांधिलकी जनतेसोबतही आहेत मात्र तितकची संविधानाबद्दलही आहे, असे आवाहन मोदींनी केले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*