विशेष प्रतिनिधी
नागपूर : नागपूरच्या संघ मुख्यालयाजवळ भाजप- काँग्रेस कार्यकर्ते समोरासमोर भिडल्याची घटना घडली आहे. “संघ मुख्यालय से संसद तक” या आशयाची एक रॅली युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काढली होती.मात्र सुरक्षेच्या कारणावरून ही रॅली संघ मुख्यालयाच्या अरूंद गल्लीतून काढता येत नाही .असे असताना देखील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अरेरावी करत बळजबरीने ही रॅली मुख्यालया समोरून नेली .यावेळी तेथे असणार्या भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना रोखले दरम्यान दोन्ही कडून धक्काबुक्की करण्यात आली.Nagpur: RSS headquarters – Many restrictions on traffic for security reasons – Congress bullying – BJP’s Answer : Read What exactly happened?
स्थानिक काँग्रेस नगरसेवक बंटी शेळके यांनी महागाई, बेरोजगारी विरोधात काढलेली बाईक रॅली संघ मुख्यालयाजवळून नेण्याचा प्रयत्न केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचे प्रयत्न केला.
मात्र काँग्रेस कार्यकर्ते त्या अरुंद गल्लीतून रॅली नेण्यावर अडून राहिल्यामुळे तिथे तणाव निर्माण होऊन शाब्दिक वादावादी व धक्काबुक्की झाली.
संघ मुख्यालयाचा परिसर हा दाटीवाटीचा असून, सुरक्षेच्या कारणास्तव तिथे वाहतुकीवर अनेक निर्बंध आहेत. मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी तिथूनच रॅली नेण्याचा हट्ट धरला. त्यावर तेथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी यास विरोध दर्शवला आणि त्यामुळे वाद निर्माण झाला .
संघ मुख्यालय सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाण असल्याने त्या ठिकाणी विशेष सुरक्षा व्यवस्था लावलेली असते. संघ मुख्यालयात तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीसही घटनास्थळी पोहोचले.
मात्र पोलिसांची संख्या कमी असल्याने कार्यकर्ते नियंत्रणात येत नव्हते. पोलिसांची संख्या वाढल्यानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना मागे हटविण्यात आलं. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते निघून गेले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App