#MythvsFacts : लसीबाबत खोटा बोभाटा करण्याचा ठेका घेतलेल्या कॉंग्रेसला भारत बायोटेकने दिले उत्तर ; संबित पात्रांनी घेतले फैलावर ; आरोग्य मंत्रालयाने उघडे पाडले कॉंग्रेसचे पितळ ; शिवसेनेने केली कानउघाडणी


काँग्रेसच्या खोट्या प्रसारावर भडकले आरोग्य मंत्रालय


काँग्रेसच्या आयटी सेलमधील एका सदस्याने कोव्हॅक्सिन लसीबाबत खोटा प्रचार केला आहे .


खरं तर लसींबाबत आतापर्यंत अनेक प्रकारचे भ्रम लोकांमध्ये आहेत. अनेक ग्रामीण भागात तर अशाच वेगवेगळ्या भ्रामक गोष्टींमुळे मोठ्या प्रमाणात लोकं लस घेण्यास नकार देत आहेत. ज्यामुळे लसीकरण अभियानात अडचण निर्माण होत आहे.


वृत्तसंस्था

नवी दिल्ली: सुरवाती पासूनच कॉंग्रेसने व्हॅक्सिन विरोधी भूमिका वठवली आहे .व्हॅक्सिन बाबत वारंवार गैरसमज पसरवण्याचा ठेकाच कॉंग्रेसने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे .आता कोरोना लसीमध्ये गायीच्या वासराच्या रक्ताचा वापर होत असल्याची अफवा कॉंग्रेस पसरवत आहे .यावरुन भारत बायोटेकने या खोट्या प्रसाराचा समाचार घेत एक परिपत्रक जारी केले आहे .तर आरोग्य मंत्रालयाने देखील याबाबत  #MythvsFacts म्हणतं कॉंग्रेसची पोलखोल केली आहे .

आरोग्य मंत्रालय – 

Ministry of Health (@MoHFW_INDIA) Tweeted:
#MythvsFacts

#LargestVaccineDrive

The final vaccine product of #COVAXIN does not contain newborn calf serum at all.

https://t.co/2sbXI3xOTu https://t.co/yOmNpBB9gA https://twitter.com/MoHFW_INDIA/status/1405070440641355776?s=20

भारत बायोटेकचे उत्तर

कोव्हॅक्सिन बनविणारी कंपनी भारत बायोटेकचं म्हणणं आहे की, ‘वायरल लसीच्या निर्मितीसाठी गायीच्या वासरांच्या सीरमचा उपयोग होते. याचा वापर सेल्स ग्रोथसाठी होतो. पण SARS CoV2 व्हायरसच्या ग्रोथच्या फायनल फॉर्म्युल्यात याचा वापर झालेला नाही.’ त्यामुळे भारत बायोटेकचा असा दावा आहे की, कोव्हॅक्सिन ही पूर्णपणे शुद्ध आहे.

भाजपची भूमिका-

भारतीय जनता पक्ष देखील चांगलाच संतापला आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी याबाबत असं म्हटलं आहे की, कोव्हॅक्सिनबाबत  संभ्रम निर्माण करुन काँग्रेसने मोठं पाप केलं आहे. मी काँग्रेस नेत्यांना विशेषत: सोनिया, प्रियंका आणि राहुल गांधी यांना विचारु इच्छितो की, त्यांनी आपली लस घेतली आहे की नाही?

काँग्रेस आयटी सेलच्या टीममधील सदस्याने आपल्या ट्विटर हँडलवर गोहत्या आणि वासराचे रक्त या शब्दांचा उल्लेख केला आहे. पण आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे की, कोव्हॅक्सिनमध्ये वासराचं रक्त किंवा सीरम नाही.’ असंही संबित पात्रा म्हणाले आहेत.

या प्रकरणाला धार्मिक रंग दिला जात आहे. खरं तर काँग्रेसला लसीकरण मोहीम व्यवस्थित चालू द्यायची नाही. हा पक्ष लस घेण्याबाबत लोकांमध्ये संभ्रम तर निर्माण करत आहेच पण त्यांना लसीकरण देखील व्यवस्थित होऊ द्यायचं नाहीए.’

काँग्रेसने कायमच लसीकरणाचा वेग कमी करण्याला आणि लस वाया घालविण्याला प्रोत्साहन दिलं आहे. छत्तीसगड, पंजाब आणि राज्यस्थानसारख्या राज्यांमध्ये आतापर्यंत काय झालं आहे. हे आपल्याला पाहायला मिळालंच आहे.’ असा हल्ला संबित पात्रा यांनी केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

काँग्रेसचे गौरव पांधी यांनी असा दावा केला आहे की, 20 दिवसांपेक्षा कमी वय असलेल्या गायीच्या वारसाच्या सीरमचा वापर कोव्हॅक्सिनमध्ये केला जात आहे. जर असं असेल तर सरकारने याबाबत आधीच का नाही माहिती दिली? कारण यामुळे धार्मिक भावनांना ठेच पोहचली असती म्हणून?

गौरव पांधी यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे आणि ट्विटमध्ये त्यांनी दाखल केलेल्या RTI चं जे उत्तर मिळालं आहे ते शेअर केलं आहे. यामध्ये गौरव पांधी यांचं म्हणणं आहे की, मोदी सरकारने मान्य केलं आहे की, कोव्हॅक्सिनमध्ये वासराचं सीरम वापरण्यात आलं आहे. यामध्ये 20 दिवसांपेक्षा कमी वयाच्या वासराची हत्या करुन त्याचा वापर केला जातो. हा गंभीर अपराध आहे.

शिवसेनेने कॉंग्रेसला फटकारले –

शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विटरवर असं म्हटलं आहे की, ‘जे लोकं वैज्ञानिक रिसर्चच्या दाव्यांबाबत बोलत असतात आता ते लोकं कोव्हॅक्सिनबाबत यापद्धतीचे दावे पोस्ट करत आहेत. कृपया लसीविषयी अशा प्रकारच्या गोष्टी पसरवणं बंद करा.’

#MythvsFacts: Bharat Biotech responds to Congress over contract to spread misconceptions about vaccines; Sambit patra slams Congress; truth by health ministry

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात