विशेष प्रतिनिधी
मुंबई: महाराष्ट्रात सर्वच ज्या मान्सूनची आतुरतेने वाट पाहत असतात तो मान्सून आज मुंबईत दाखल झाला आहे. हवामान विभागाने याबद्दलची माहिती दिली आहे. मुंबईत सर्वसाधारणपणे १० जूनपर्यंत मान्सूनचं आगमन होतं परंतू यंदा मान्सून एक दिवस आधीच दाखल झाला आहे.मुंबईत आज मान्सूनने हजेरी लावली. काल रात्रीपासून मुंबई शहरासह उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावली .मुंबईत यंदा पावसामुळे पाणी साचणार नाही असा दावा महापालिकेने केला होता. परंतू पहिल्याच प्रयत्नात हा दावा फोल ठरला आहे. सायनसह मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी साचलं नुकतीच कोरोनातून अनलॉक झालेली मुंबई पावसाने ब्लॉक झाली आहे .MUMBAI RAINS: Tumbai of Mumbai; BMC’s all-cleansing claims fall; Andheris subways closed; Unlocked from Corona blocked by Rain
मान्सूनच्या पहिल्या पावसातच मुंबई महापालिकेने नालेसफाईचे केलेले दावे फोल ठरले असून मुंबईची दाणादाण उडाली.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. यामुळे मुंबईतील अनेक रस्ते हे जलमय झाले आहेत.
#Monsoon has arrived in Mumbai today, normal arrival date is 10th June every year so it has arrived prior to the average arrival date: Dr Jayanta Sarkar, Deputy Director General (DDG), IMD Mumbai — ANI (@ANI) June 9, 2021
#Monsoon has arrived in Mumbai today, normal arrival date is 10th June every year so it has arrived prior to the average arrival date: Dr Jayanta Sarkar, Deputy Director General (DDG), IMD Mumbai
— ANI (@ANI) June 9, 2021
मुंबईत ११ जून पर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मुंबईसह किनारपट्टी भागात पुढचे ४ दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाच्या संचालक शुभांगी भुते यांनी दिली.
मुंबईत आज दिवसभर वातावरण ढगाळ राहणार असून शहर आणि उपनगर भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आतापर्यंत मुंबईच्या ई वॉर्डात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. मुंबई शहरात दुपारपर्यंत ४८.९९ एम.एम. , पूर्व उपनगरात ६६.९९ एम. एम. तर पश्चिम उपनगरात ४८.७८ एम.एम. पावसाची नोंद झाली आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज पहाटेपासूनच आभाळ दाटून आलेलं पहायला मिळालं. सकाळपासून शहरातील अनेक भागांमध्ये गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मान्सून शनिवारी रत्नागिरीच्या हर्णे किनारपट्टी भागात पोहचल्याची हवामान विभागाने दिली आहे. मुंबई महापालिकेनेही हवामान विभागाचा अंदाज लक्षात घेऊन शहरात पावसामुळे पाणी साचणार नाही तसेच कोणताही अपघात होणार नाही याची काळजी घेतली आहे.
#WATCH | Maharashtra: Andheri Subway in Mumbai, closed due to severe waterlogging. Several parts of the city are witnessing waterlogging today due to heavy rainfall. #Monsoon pic.twitter.com/heb4iFJRxd — ANI (@ANI) June 9, 2021
#WATCH | Maharashtra: Andheri Subway in Mumbai, closed due to severe waterlogging. Several parts of the city are witnessing waterlogging today due to heavy rainfall. #Monsoon pic.twitter.com/heb4iFJRxd
अंधेरी येथील सब वे हा पावसाचं पाणी साठल्याने बंद करण्यात आला आहे. आज सकाळपासूनच मुंबईत मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो आहे. त्यामुळे अंधेरीतील सब वे भागात पाणी साठलं आहे. याच कारणामुळे हा सब वे बंद करण्यात आला आहे. या ठिकाणी महापालिकेतील आपात्कालीन विभागाचे कर्मचारी उभे राहिले आहेत आणि पर्यायी मार्गांचा वापर करा असे सांगत आहेत.
मुंबई बारिश की आगोश में है।हर तरफ अँधेरा।अँधेरी सबवे ने मिलन सबवे को पछाड़ दिया है।किंग सर्कल और माटुंगा तैर रहे हैं।सौ करोड़ खर्च करके पता नहीं कहाँ का नाला साफ किया #BMC ने ?पहले दिन यह हाल !#MumbaiRains pic.twitter.com/rnMIrZTwnP — Sanjay Nirupam (@sanjaynirupam) June 9, 2021
मुंबई बारिश की आगोश में है।हर तरफ अँधेरा।अँधेरी सबवे ने मिलन सबवे को पछाड़ दिया है।किंग सर्कल और माटुंगा तैर रहे हैं।सौ करोड़ खर्च करके पता नहीं कहाँ का नाला साफ किया #BMC ने ?पहले दिन यह हाल !#MumbaiRains pic.twitter.com/rnMIrZTwnP
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) June 9, 2021
मुंबईत मान्सूनचं आगमन झालं की त्याचा पहिला फटका बसतो तो मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळख असलेल्या मुंबई लोकल सेवेला. आज मुंबईत मान्सूनचं आगमन झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आणि या पावसाचा पहिलाच फटका लोकल सेवेला बसला आहे. सेंट्रल रेल्वे मार्गावर कुर्ला ते सीएसएमटी मार्गावरची लोकल सेवा रेल्वे प्रशासनाने बंद केली होती. यानंतर पावसाचा जोर पाहता ही सेवा ठाणे ते सीएसएमटी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय सेंट्रल रेल्वे प्रशासनाने घेतला
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App