विशेष प्रतिनिधी
चेन्नई: डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वातील सनरायजर्स हैदराबाद आणि रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स या दोन संघांमध्ये थोड्या वेळातच आयपीएलची नववी मॅच होणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर ही मॅच होईल. mumbai indians vs sunrisers hyderabad
हैदराबादला या हंगामात एकही सामना जिंकता आला नाही. त्यामुळे हा सामना जिंकून पहिला विजय सकारण्याचा हैदराबादचा प्रयत्न असेल.
मागील सामन्यात मुंबईने कोलकाता विरुद्ध मोक्याच्या क्षणी सामना फिरवून विजय मिळवला होता. मुंबईचा संघ सर्व संघांपैकी सर्वात तगडा संघ मानला जात आहे. कर्णधार रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव तसेच संघातील इतर खेळाडू फॉर्ममध्ये आहेत. तर मुंबईकडे बोल्ट आणि बुमराह हे जागतिक दर्जाचे 2 महत्वाचे गोलंदाज आहेत.
साधारण हैदराबाद विरुद्ध मुंबई आतापर्यंत IPLमध्ये झालेल्या सामन्यांचा विचार करायाचा झाला तर दोन्ही संघ 16 सामने एकमेकांविरोधात खेळले आहेत. त्यापैकी दोन्ही संघ 8-8 वेळा जिंकले आहेत.
या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मासह अनेक क्रिकेटपटूंना विक्रम करण्याची संधी आहे.
सनरायझर्स हैदराबाद संघ ऋद्धिमान साहा, डेव्हिड वॉर्नर (कॅप्टन), मनीष पांडे, जॉनी बेअरस्टो / केन विल्यमसन, अब्दुल समद, केदार जाधव / विजय शंकर, जेसन होल्डर, रशीद खान, भुवनेश्वर कुमार, शाहबाज नदीम, आणि टी नटराजन
मुंबई इंडियन्स संघ क्विंटन डी कॉक, रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, किरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, मार्को जेन्सन / नाथन कुलपर नाईल, राहुल चहर, ट्रेंट बाउल्ट आणि जसप्रीत बुमराह
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App