वारंवार होणारा पराभव आणि जनतेच्या नकारामुळे हताश झालेले राजकीय नेते नैराश्यातून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम करीत असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्यक कामकाज मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी केला.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : वारंवार होणारा पराभव आणि जनतेच्या नकारामुळे हताश झालेले राजकीय नेते नैराश्यातून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम करीत असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्यक कामकाज मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी केला. mukhtar abbas naqvi farmer protest news
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना शेतीसंदभार्तील काहीही जाण नसताना ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात; आणि दुसरीकडे करने में झीरो- धरने में हिरो या न्यायाने जगणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काम करीत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांची सक्षमतेसाठी उपाययोजना केल्या आहेत. शेतकऱ्यांना हमी भाव, किसान मंडी आणि जमिनीची मालकी या तीनच मुद्यांवर चिंता आहे. या तीनही मुद्यांवर सरकारने लेखी हमी दिली आहे. हमी भाव, बाजारातील स्थान आणि जमिनीची मालकी या तीनही बाबी शेतकऱ्यांच्य्य बाजूनेच राहणार आहेत. देशात मोदींची बदनामी करणारा एक परंपरागत समूह आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने कधीही संघषार्ची तयारी केली नाही; उलट सातत्याने चर्चाच केली आहे. चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे धोरण स्वीकारले. सरकारचे म्हणणे शेतकऱ्यांना मान्य झाले असताना दिशाभूल करणारी मंडळी सातत्याने हा मुद्दा चिघळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही नकवी यांनी म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App