कोरोनाच्या संकटाने सारे जग गोंधळून गेले आहे. पण संकटातूनच उभारी घेणे हे भारताच्या डीएनएमध्येच आहे. प्रत्येक संकटातून संधी निर्माण होते. अशाच कोविड संकटाला भारताने धीरोदात्तपणे तोंड दिले असल्याचे मत रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी व्यक्त केले.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोनाच्या संकटाने सारे जग गोंधळून गेले आहे. पण संकटातूनच उभारी घेणे हे भारताच्या डीएनएमध्ये आहे. प्रत्येक संकटातून संधी निर्माण होते. अशाच कोविड संकटाला भारताने धीरोदात्तपणे तोंड दिले आहे, असे मत रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी व्यक्त केले.
Mukesh Ambani says Resurrection is in India’s DNA
पार्टनरिंग फॉर डिजीटल इंडिया या परिसंवादात अंबानी सहभागी झाले होते. फेसबुकचे प्रमुख मार्क झुकेरबर्गही या वेळी उपस्थित होते. डिजिटल वॉलेट पेमेंट सर्व्हिस व्हॉट्सअॅप पे भारतात सुरु होत आहे.
आम्ही भारतात व्हॉटसअॅप पे लाँच केले आणि हे शक्य झाले ते भारतातल्या युपीआय व्यवस्थेमुळे तसेच १४० बँकांच्या तप्तरतेमुळे, असे कौतुक झुकेरबर्ग यांनी केले आहे. हे शक्य करून दाखवणारा भारत हा पहिलाच देश असल्याचेही ते म्हणाले.
फेसबुकच्या मालकीची व्हाट्सअॅप पे ही सेवा सुरु करण्याची घोषणा मार्क झुकेरबर्गने गतवर्षी केली होती. ३०० मिलियन व्हाट्सअॅप वापरकर्त्यांसाठी युपीआय पे सेवा सुरु करण्याचे जाहीर केले होते. ही सेवा आता भारतात सुरु झाला आहे.
गेल्या वर्षी देशातील दहा दशलक्ष वापरकर्त्यांसह व्हॉट्सअॅपने आपल्या पेमेंट सेवेची चाचणी सुरू केली होती. जी डिजिटल पेमेंट्स फ्रेमवर्कच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये अडकली होती, पण आता ही सेवा अंतिम टप्प्यात आली आणि आता ती सुरु झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App