किमान आधारभूत किमती 200 ते 1000 टक्क्यांनी वाढल्या तरी…

  • शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवण्याची काँग्रेससह विरोधकांची मोहीम

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : शेतमाल उत्पादनाच्या किमती यूपीए सरकारच्या कालावधीपेक्षा एनडीए सरकारच्या कालावधीत 200 टक्के ते 1000 टक्‍क्‍यांपर्यंत वाढूनही काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवत आहेत. तांदूळ, गहू, कडधान्ये, तीळ आदी शेतमाल उत्पादनाच्या आधारभूत किमतीमध्ये यूपीए सरकारच्या काळापेक्षा एनडीए सरकारच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली.

ही सरकरी वाढ आकडेवारीमध्ये स्पष्ट दिसत असताना शेतकरी आंदोलनाचे निमित्त करून काँग्रेससह इतर सर्व पक्ष शेतकऱ्यांमध्ये किमान आधारभूत किमतीच्या विषयावर गैरसमज पसरवत आहेत. MSP increase in NDA 200% to 1000%

एनडीए सरकारच्या काळात तांदळाच्या आधारभूत किमती 240 टक्‍क्‍यांनी, गव्हाच्या किमती 177 टक्क्यांनी, कडधान्यांच्या किमती 7500 टक्क्यांनी आणि तिळाच्या किमती एक हजार टक्क्यांनी वाढल्याचे सरकारी आकडे सांगतात. अशा स्थितीत मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांमध्ये शेतमाल उत्पादनाच्या किमान आधारभूत किमतीचा उल्लेखच नाही असा गैरसमज काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष शेतकऱ्यांमध्ये पसरवत आहेत.

एवढेच नाही तर उदाहरण द्यायचे झाले तर युपीए सरकारच्या कालावधीत कडधान्यांची सरकारी खरेदी फक्त 645 कोटी रुपयांची होती. एनडीए सरकारच्या काळात तब्बल एकूण हा 50000 कोटी रुपयांची कडधान्ये खरेदी सरकारने केली.

शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा विरोधकांचा प्रयत्न- पंतप्रधान

या खरेदीच्या रकमेतील तफावत पाहता एनडीए सरकारच्या कालावधीत शेतकऱ्यांना झालेल्या लाभाची आकडेवारीसह स्पष्ट कल्पना येते. अशा स्थितीतही शेतकरी आंदोलनाचे निमित्त करून काँग्रेस सह विरोधी पक्ष शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवत असल्याचेही स्पष्ट होते.

MSP increase in NDA 200% to 1000%

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात