विशेष प्रतिनिधी
मुंबई: अखेर तब्बल 2 वर्षानंतर 2019 च्या MPSC परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा निकाल प्रलंबित असलेला MPSC चा निकाल आता जाहीर करण्यात आला आहे. 2019 मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. मात्र कोरोनाची साथ आली त्यामुळे निकाल लागण्याास उशीर झाला होता. तसंच मराठा आरक्षणाचा प्रश्नही होताच त्यामुळे निकाल लागण्यास उशीर झाला. अनेक जणांना पदं मिळाली आणि त्यांच्या नियुक्त्या होऊ शकल्या नव्हत्या.
या परीक्षेचा अंतिम निकाल जवळपास दोन वर्षांनी लागला आहे. ज्यात साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात पहिला आला असून मानसी पाटील ही मुलींमध्ये राज्यात पहिली आली आहे. रोहन कुंवर हा मागासवर्गीयांमध्ये पहिला आणि राज्यात तिसरा आला आहे. रविंद्र शेळके हा परिक्षार्थी दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला असून दादासाहेब दराडे याने चौथा क्रमांक पटकावला आहे.
खुल्या प्रवर्गातून प्रसाद चौगुले याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर मागास वर्गातून रोहन कुंवर यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे. तसंच महिला प्रवर्गातून मानसी पाटील यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 चा सुधारित अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://t.co/j9zwBb78bI — Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) September 28, 2021
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 चा सुधारित अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://t.co/j9zwBb78bI
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) September 28, 2021
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App