विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील MPSC ची तयारी करणार्या आणि PSI होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. MPSC ने PSI भरतीबाबत एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार PSI पदाची मुलाखत देण्यासाठी शारीरिक चाचणीत ६० गुण मिळवणं आवश्यक असणार आहे. शारीरिक चाचणीत ६० गुण असतील तरंच विद्यार्थ्यांना मुलाखत देता येणार आहे. आता मैदानी गुण फक्त क्वालिफिकेशनसाठी गृहीत धरले जाणार आहेत, तशी माहिती MPSC ने जारी केलेल्या परिपत्रकात दिली आहे .MPSC : Important decision regarding PSI recruitment
PSI भरतीसाठी विद्यार्थ्यांना आता MPSC पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि त्यानंतर मैदानी परीक्षेत ६० गुण आवश्यक असणार आहेत. त्यानंतरच या विद्यार्थ्यांना मुखालतीसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे. MPSCच्या २०२० मध्ये निघालेल्या जाहिरातीसाठी हा नियम लागू असणार आहे. तशी माहिती MPSC कडून देण्यात आलीय. यापूर्वी शारीरिक चाचणीचे गुण निकालासाठी एकत्रित केले जात होते. मात्र आता अंतिम गुणवत्ता यादीतून शारीरिक चाचणीचे गुण वगळण्यात आले आहेत. हे गुण आता फक्त पात्रतेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App