मोदींच्या नेतृत्वाची कमाल; देशाला त्यांच्यामुळेच स्थैर्य संजय राऊत यांचा मोदींवर कौतुकाचा वर्षाव


विशेष प्रतिनिधी

मुंबई: माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपला यशाच्या शिखरावर नेलं. मोदी हे मोदी आहेत. दुसरे मोदी होऊ शकत नाही, अशा शब्दांत मोदींचं तोंडभरून कौतुक करतानाच मोदी संध्याकाळी कोणता केक कापतात, ते पाहावं लागेल, असा चिमटा शिवसेना नेते संजय राऊत यांनी काढला.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी शुभेच्छा देतानाच त्यांचे भरभरून कौतुकही केले. मोदींमुळे देशाला राजकीय स्थैर्य लाभलं. भाजप कायम आघाड्या करून सत्तेत येत होता.

वाजपेयींनंतर त्यांनी भाजपला शिखरावर नेलं. मोदींच्या नेतृत्वात भाजप एकहाती सत्ता घेऊन आली. त्यांनी भाजपला पूर्ण बहुमत मिळवून दिलं. ही त्यांच्या नेतृत्वाची कमाल आहे. त्यांच्या तोडीचा आज दुसरा नेता देशात दिसत नाही, असं राऊत म्हणाले.

  • मोदींच्या नेतृत्वाची कमाल;देशाला त्यांच्यामुळेच स्थैर्य
  •  त्यांच्या तोडीचा आज दुसरा नेता देशात दिसत नाही
  •  नरेंद्र मोदी यांनी भाजपला यशाच्या शिखरावर नेलं
  •  मोदी हे मोदी आहेत. दुसरे मोदी होऊ शकत नाही
  •  शुभेच्छा देतानाच त्यांचे भरभरून कौतुकही
  •  मोदींच्या नेतृत्वात भाजपला एकहाती सत्ता

Modi’s leadership is uncopmerable; The country is stable because of modi only

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण